कचऱ्याच्या आगीत कार खाक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 मार्च 2018

औरंगाबाद - शहागंज परिसरातील मोहन टॉकीजच्या मागच्या बाजूस सोमवारी (ता. १२) इंडिका कार (एमएच- २०, बीवाय- ४०९६) जळून खाक झाली. कचऱ्याला लागलेल्या आगीमुळे कार जळाल्याची शंका नागरिकांनी व्यक्त केली. या घटनेची सिटी चौक पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी ६.२५ च्या सुमारास शहागंज परिसरातील मोहन टॉकीजच्या मागच्या परिसरात कारने पेट घेतल्याची माहिती नागरिकांनी अग्निशमन विभागाला दिली. मात्र, अग्निशमन बंब पोचेपर्यंत कार खाक झाली  होती. अग्ग्निशमन बंबाने घटनास्थळी पोचल्यावर आग आटोक्‍यात आणली. त्यात कारचे सुमारे तीन लाखांचे नुकसान झाले आहे. मात्र, आगीचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. कचऱ्याच्या ढिगाऱ्याशेजारी कार उभी होती. कचऱ्याला लागलेल्या आगीमुळे कार जळाल्याचा अंदाज नागरिकांनी व्यक्त केला.

Web Title: aurangabad news fire garbage

टॅग्स