शहागंज, पुंडलिकनगरात कचऱ्याला आग 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 मार्च 2018

औरंगाबाद - रस्त्यावर पडून असलेल्या कचऱ्याला आग लावण्याचे प्रकार सुरूच असून, गुरुवारी (ता. २२) पुंडलिकनगर आणि शहागंज येथे कचऱ्याला मोठी आग लागल्याने अग्निशामक दलाच्या जवानांना धाव घ्यावी लागली. यासंदर्भात नागरिकांनी संयम राखावा, पंधरा दिवसांत शहरातीलही कचरा समस्या सुटेल, असा दावा विशेष अधिकारी विक्रम मांडुरके यांनी केला आहे.

शहराच्या विविध भागांत मोठ्या प्रमाणात कचरा पडून आहे. पुंडलिकनगर ते गजानन महाराज मंदिरापर्यंत दुभाजकावर कचरा टाकण्यात आला आहे. तसेच शहागंज येथील जुन्या बसस्थानकाच्या मोकळ्या जागेत महापालिकेनेच कचरा जमा करून त्याचे ढीग लावले आहेत. हा कचरा आठ-आठ दिवस उचलला जात नसल्याने त्यातून प्रचंड दुर्गंधी सुटली आहे.

दुर्गंधीमुळे रोगराई पसरण्याची भीती असल्याने नागरिकांकडून कचरा पेटवून देण्यात येत आहे. गुरुवारी दुपारी शहागंज व पुंडलिकनगर या दोन ठिकाणी मोठी आग लागली. अग्निशामक दलाने ती आटोक्‍यात आणण्याचा प्रयत्न केला.

Web Title: aurangabad news fire garbage issue

टॅग्स