माजी महापौरांची  सोशल मीडियावर बदनामी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 मार्च 2018

औरंगाबाद - माजी महापौरांची बदनामी करण्याच्या उद्देशाने वॉर्डात घरोघरी जाऊन तसेच तयार केलेली व्हिडिओ क्‍लिप व्हॉट्‌सॲप ग्रुपवर प्रसारित केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यावरून सुनील सोनवणे आणि रवी गुलाब शिंदे यांच्याविरुध्द मुकुंदवाडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला. 

माजी महापौर तथा नगरसेवक भगवान (बापू) घडामोडे (५४, रा. एन-२, ए-५६, विठ्ठलनगर, सिडको) यांची बदनामी करण्यासाठी वॉर्डातील रवी शिंदे व त्याचा मित्र सुनील सोनवणे यांनी मोबाईलवर व्हिडिओ क्‍लिप बनवली. यात त्यांनी घडामोडेंनी वॉर्डात काहीही काम केले नाही.

मंदिराच्या सभागृहाचे हप्ते घेतात. त्याचप्रमाणे नवीन पिढी त्यांच्यामुळे व्यसनाधीन होत आहे. तसेच त्यांचे वॉर्डातील काम कसे चुकीचे आहे, अशा बदनामीचे दोन व्हिडिओ सोशल मीडियावर टाकले. हा प्रकार निदर्शनास आल्यावरून घडामोडे यांनी मुकुंदवाडी पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली. त्यावरून संबंधित दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: aurangabad news former mayors slander on social media