'सकाळ'चा उपक्रम पोलिसांना प्रोत्साहन देणाराः पोलिस आयुक्त यशस्वी यादव

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

0 आयूक्तांच्या हस्ते पोलिसांना चिक्की वाटप
0 "सकाळ'तर्फे "तंदुरुस्त बंदोबस्त' उपक्रम

औरंगाबादः सामाजिक जबाबदारीचे भान राखून "सकाळ' चारवर्षांपासून बंदोबस्तावरील पोलिसांना चिक्की वाटप करीत आहे. हा उपक्रम पोलिसांना प्रोत्साहन देणारा आहे. यामूळे पोलिसांची ड्युटी व गणेश उत्सवाच्या काळ शांतता व सुरक्षिततेत पार पडले असा विश्‍वास पोलिस आयूक्त यशस्वी यादव यांनी व्यक्त केला.

"सकाळ माध्यम समूहा'तर्फे गणेशोत्सवाच्या काळात चोवीस तास ऑनड्युटी असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांसाठी तंदुरुस्त बंदोबस्त उपक्रम राबविण्यात येतो. सोमवारी (ता. चार) दुपारी दोनला पोलिस आयुक्तालयात या उपक्रमाचे पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. त्यानंतर आयुक्त यशस्वी यादव बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर सकाळचे कार्यकारी संपादक संजय वरकड, रवि मसालेचे अजित जैन यांची उपस्थिती होती. श्री यादव म्हणाले ""सामाजिक भान ठेवून सकाळतर्फे चिक्की वाटप केले जात आहे. बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना सकाळतर्फे चिक्की वाटप केले जात आहे ही बाब कौतूकास्पद उपक्रम आहे.''

यावेळी "सकाळ'चे कार्यकारी संपादक संजय वरकड म्हणाले, "विशेष पोलिस अधिकारी नविन संकल्पना आहे. यात समाजातील प्रत्येक विचारांचा माणूस एक झाला व शहराची सुरक्षा करणे हीच त्यांच्यात भावना आहे. ही कौतुकास्पद बाब असून सकाळ व पोलिस आयूक्त यशस्वी यादव यांची संकल्पना एकाच पद्धतीची असल्याची बाबही त्यांनी नमूद केली.''

यावेळी रवि मसालेचे संचालक फुलचंद जैन, नंदकिशोर जैन, रवि जैन, अशोक जैन, निखिल जैन, नितिन जैन, स्वप्निल जैन, आशिष जैन, यश जैन, गजानन देशमूख तसेच सहायक आयूक्त सी. डी. शेवगण, आरपीआय पोलिस निरीक्षक राजेंद्र कुत्तुल यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
सरकारी थकबाकीदार सत्यपाल सिंह मंत्रिमंडळात 
दुर्दैवी अनिता अन्‌ तमीळ अस्मिता...!
धुळे जिल्ह्यात 351 वर्गखोल्या धोकादायक
एकाच कुटूंबातील 3 भावंडांचा तलावात बुडून मृत्यू
मानाच्या बाप्पांचे यंदाही हौदांमध्ये विसर्जन
भाविकांच्या गर्दीने रस्ते दिसेनासे झाले
'व्हेंटिलेटर' आणि 'हाफ तिकीट' सर्वोत्कृष्ट चित्रपट

Web Title: aurangabad news ganesh fetival sakal police and yashaswi yadav