सिल्लेखान्यातून उचलला १५ टन ओला कचरा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 जून 2018

औरंगाबाद - कचराकोंडीला साडेतीन महिने उलटल्यानंतरही शहरातील अनेक भागांत नागरिक ओला - सुका कचरा रस्त्यावर फेकत आहेत. सिल्लेखान्यात जमा झालेल्या संमिश्र कचऱ्यातून महापालिका व बचतगटाच्या ७५ कर्मचाऱ्यांनी दिवसभर प्लॅस्टिक व ओला कचरा वेगवेगळा केला. तब्बल १५ टन ओला कचरा हर्सूल येथे प्रक्रिया केंद्रावर पाठविण्यात आला. 

शहरातील रस्त्यांवर पडलेला मिक्‍स कचरा उचलून तो महापालिकेने ठरविलेल्या तीन प्रक्रिया केंद्रांत नेऊन ओला - सुका असे वर्गीकरण करण्याचे आदेश संनियंत्रण समितीने दिले आहेत. त्यानुसार दोन आठवड्यांपूर्वी शहरातील संपूर्ण कचरा उचलण्यात आला होता. मात्र, मिक्‍स कचरा प्रक्रिया केंद्रांवर तसाच पडून राहत असल्याने परिसरातील नागरिकांसह नगरसेवक विरोध करीत आहेत. त्यामुळे कचरा उचलण्याचे काम काही दिवसांपासून ठप्प होते. दरम्यान, जुन्या शहरात जागोजागी पुन्हा कचऱ्याचे ढीग तयार झाले आहेत. त्यामुळे या मिक्‍स कचऱ्याचे जागेवरच विलगीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार बुधवारी प्रभाग क्रमांक दोन अंतर्गत स्वच्छता निरीक्षकासह सुमारे ७५ जणांनी जवळपास तीन ट्रक कचऱ्याचे वर्गीकरण केले. मोहिमेत विकास मोहाडे, किशोर नाडे, कलीम सय्यद, खेमचंद वाघमारे, सतीश खरात, मनोज बनसोडे आदींनी पुढाकार घेतल्याचे घनकचरा व्यवस्थापन प्रमुख विक्रम मांडुरके यांनी सांगितले.

Web Title: aurangabad news garbage