गॅस सिलेंडरने घेतला पेट; जीवितहानी टळली

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 सप्टेंबर 2017

औरंगाबाद : नारेगाव येथील गल्ली नंबर चार मध्ये आज (शनिवार) दुपारी दसऱ्याच्या स्वयंपाक करण्यासाठी रिफिल केलेले सिलेंडर लावताना पेट घेतला. प्रसंगावधान राखून नागरिकांची मदत आणि अग्निशमनचा बंब वेळेत पोहोचल्याने मोठी जीवितहानी टळली.

आगीत घरच्या साहित्याचे किरकोळ नुकसान झाले. तसेच दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. शिवनाथ रघुनाथ बोगाने (वय 26) व गायबाई लक्ष्मण ताठे (वय 60) अशी जखमींची नावे आहेत. शेजाऱ्यांनी वेळीच अग्निशमन विभागाला कळविल्याने पेट घेतलेल्या सिलेंडरचा स्फोट होण्यापूर्वीच आग आटोक्यात आणण्यास अग्निशमन जवानांना यश आले.

Web Title: aurangabad news Gas cylinder stomach; Survivor survived