आई बरी होण्यासाठी चिमुकल्यांची धडपड 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 मार्च 2018

औरंगाबाद - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय (घाटी) येथे गेल्या महिनाभरापासून दहा वर्षांची चिमुकली दोन भावंडांसह आजारी आईची शुश्रूषा करीत आहे. या तिन्ही भावंडांची अशी मातृसेवा सध्या सर्वांच्या कौतुकाचा विषय बनली आहे. 

त्यांची आई सुवर्णा विष्णू शिंदे (वय 36, रा. कांचनवाडी, पैठण रोड) या गंभीररीत्या जळाल्याने त्यांना महिनाभरापूर्वी "घाटी'त दाखल करण्यात आले होते. त्या वेळी त्या 55 टक्के भाजलेल्या होत्या. उपचारानंतर त्यांची प्रकृती सुधारत आहे. त्यांचा सांभाळ करण्यासाठी कोणीही येत नसल्याने मुलगी अंजलीसह अजय व यश ही दोन मुले "घाटी'त दिवसरात्र देखभाल करीत आहेत. 

घरची परिस्थिती हलाखीची असल्याने औषधोपचाराचा प्रश्न सतावत होता. के. के. ग्रुपचे अखिल अहेमद, किशोर वाघमारे यांनी ही गरज ओळखून त्यांना मदतीचा हात दिला. "घाटी'तील डॉक्‍टरांसह परिचारिकांच्या मदतीमुळे आईची प्रकृती सुधारत असल्याचे अंजलीने सांगितले.

Web Title: aurangabad news ghati hospital marathwada struggle of the son