घाटीचे प्रशिक्षणार्थी डॉक्‍टर संपावर 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 जून 2018

औरंगाबाद - विद्यावेतनात वाढ करावी या मागणीसाठी राज्यातील प्रशिक्षणार्थी डॉक्‍टर्स मंगळवारी (ता. १२) मध्यरात्रीपासून संपावर गेले आहेत. यासंदर्भात असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्न (अस्मि)च्या प्रशिक्षणार्थी डॉक्‍टरांनी मंगळवारी घाटीच्या कॉलेज कौन्सिलला पत्र दिले होते. त्यानंतर रात्री बारा वाजेपासून हे डॉक्‍टर संपावर गेले.

घाटीत बुधवारी दुपारी प्रशिक्षणार्थी डॉक्‍टरांनी घाटी परिसरात रॅली काढून घोषणाबाजी केली. मेडिसीन विभागापासून सुरू झालेली रॅली अपघात विभाग, बाह्यरुग्ण विभागातून महाविद्यालय परिसरात रॅलीचा दुपारी एक वाजता समारोप झाला. त्यानंतर अस्मीच्या शिष्टमंडळाने प्रभारी अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी भेटून निवेदन देऊन आमच्या मागण्या शासनाला कळवण्याची विनंती केली. प्रशिक्षणार्थींनी रुग्णसेवेत बाधा आणू नये, शिवाय शक्‍य तितकी मदतीची भूमिका ठेवण्याचे आवाहन डॉ. सुक्रे यांनी केले. 

घाटीत अगोदरच मनुष्यबळाची कमतरता आहे. त्यात निवासी डॉक्‍टरांना मदतीचा हात देणारे १९० प्रशिक्षणार्थी डॉक्‍टर संपावर गेल्याने रुग्णसेवेवर काहीसा परिणाम जाणवत आहे. त्या दृष्टीने घाटीने खबरदारी घेतली असून, प्राध्यापकांना विशेष लक्ष देण्याची सूचना रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. सध्या कोणतीही अडचण नसल्याचे निवासी वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे म्हणाले. विद्यावेतनाच्या वाढीसाठी चार वर्षांपूर्वी ‘अस्मि’ला ११ हजार रुपये करण्याचे आश्‍वासन शासनाने दिले होते. दोन महिन्यांपूर्वीही असेच आश्‍वासन मिळाले. तरी सध्या विद्यावेतन सहा हजार रुपयेच मिळत आहे. हे विद्यावेतन १५ पंधरा रुपये करण्याची मागणी आहे. कामाचे तास ठरवून, आंतरवासिता कालावधी संपामुळे वाढवू नये, अशी मागणीही विद्यार्थ्यांनी केली आहे. यात दंत महाविद्यालयाचे विद्यार्थीही सहभागी असल्याचे अस्मिचे सहसचिव डॉ. किशोर डुकरे म्हणाले. 

Web Title: aurangabad news ghati hospital trainee doctor strike