औरंगाबाद: महापालिकेकडून घाटीची कचरा कोंडी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 ऑक्टोबर 2017

कचरा जमा केलेल्या परिसरात दुर्गंधी पसरल्याने शेजारीच असलेल्या चार शाळा महाविद्यालयांच्या साडे तीन हजार विद्यार्थीचे आरोग्य धोक्यात आले आहे.

औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या परिसरातील वैद्यकीय, ओला व सुका कचरा महापालिकेने गेल्या आठवडाभरापासून उचललेला नसल्याने घाटीची कचरा कोंडी झाली आहे.

कचरा जमा केलेल्या परिसरात दुर्गंधी पसरल्याने शेजारीच असलेल्या चार शाळा महाविद्यालयांच्या साडे तीन हजार विद्यार्थीचे आरोग्य धोक्यात आले आहे.

घाटी प्रशासन महापालिकेच्या अधिकाऱ्यांना वारंवार विनंती करूनही कचरा उचलल्या जात नसल्याने मेटाकुटीला आले आहे.

Web Title: Aurangabad news ghati hospital waste