सोने ३१ हजार ३०० वर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जानेवारी 2018

औरंगाबाद - आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची मागणी वाढली. त्यामुळे शहरात दरात आठवडाभरापासून तेजी पाहायला मिळत आहे. महिनाभरापूर्वी प्रतितोळा २९ हजारांवर असलेले सोने ३१ हजार ३०० रुपयांवर पोचले आहे; तर येत्या आठवड्यात पुन्हा यात चारशे ते पाचशे रुपयांची वाढ होण्याची शक्‍यता विक्रेत्यांतर्फे वर्तविण्यात आली आहे. नोटाबंदी व जीएसटीनंतर वर्षभर शहरातील सराफा मार्केटमधील उलाढाल मंदावली होती; मात्र आता परिस्थिती सुधारत असून, स्थानिक सराफा मार्केटमध्ये सध्याची स्थिती पाहता नोटाबंदी व जीएसटीतून व्यापारी हळूहळू बाहेर येत आहेत; पण अद्यापही बाजारात अपेक्षित अशी उलाढाल पाहायला मिळत नाही.

औरंगाबाद - आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची मागणी वाढली. त्यामुळे शहरात दरात आठवडाभरापासून तेजी पाहायला मिळत आहे. महिनाभरापूर्वी प्रतितोळा २९ हजारांवर असलेले सोने ३१ हजार ३०० रुपयांवर पोचले आहे; तर येत्या आठवड्यात पुन्हा यात चारशे ते पाचशे रुपयांची वाढ होण्याची शक्‍यता विक्रेत्यांतर्फे वर्तविण्यात आली आहे. नोटाबंदी व जीएसटीनंतर वर्षभर शहरातील सराफा मार्केटमधील उलाढाल मंदावली होती; मात्र आता परिस्थिती सुधारत असून, स्थानिक सराफा मार्केटमध्ये सध्याची स्थिती पाहता नोटाबंदी व जीएसटीतून व्यापारी हळूहळू बाहेर येत आहेत; पण अद्यापही बाजारात अपेक्षित अशी उलाढाल पाहायला मिळत नाही. लग्नसराईतही ग्राहकांचा फारसा प्रतिसाद नसल्याने व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. दरम्यान, आठवडाभरात ३० हजार २०० वरून हा दर मंगळवारी (ता. १६) ३१ हजार ३०० रुपयांवर गेला आहे.  

डिसेंबरमध्ये झाले होते भाव कमी 
सोन्याच्या दरात चढ-उतार सुरू असते. डिसेंबर महिन्यात सोन्याचे दर हे बारोश रुपयांनी कमी झाले होते. त्यानंतर वाढता क्रम हा शंभर ते दोनशे रुपयांचा होता; मात्र एक व दोन जानेवारीला दर ३० हजार २०० रुपये होता. पंधरा दिवसांत अकराशे रुपयांनी सोने वाढले आहे. यात अजून पाचशे रुपयांची वाढ होऊन दर हा ३१ हजार सातशे ते आठशे रुपयांपर्यंत जाण्याची शक्‍यता असल्याचे सराफा असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र मंडलिक यांनी सांगितले.

Web Title: aurangabad news gold rate