ग्रामसेवकांच्या न्याय हक्कासाठी लढणार: रमेश मुळे

नवनाथ इधाटे
सोमवार, 26 मार्च 2018

ग्रामसेवकाला पोलीस संवरक्षण द्या
तालुक्यातील कोलते टाकळी येथील अतिक्रमण काढण्याबाबत ग्रामसेवकांना पोलीस संवरक्षण व इतर प्रशासकीय सहकार्य शासनाकडून देण्याचा ठराव एक मताने पारित करण्यात आला. तसेच कंत्राटी ग्रामसेवकांचा तीन वर्षाचा सेवाकाळ नोकरीमध्ये धरल्याबाबतचा शासन निर्णय काढल्याने शासनाच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आले.

फुलंब्री : ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकासाची जबाबदारी ग्रामपंचायतीकडे देण्यात आलेली आहे. शासनाचा सेवक म्हणून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाचा विकास साधण्याचे काम ग्रामसेवक करीत असतात. मात्र ग्रामसेवकांच्या मागण्याकडे शासन दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे ग्रामसेवकांच्या न्याय व हक्कासाठी सतत लढणार असल्याचे प्रतिपादन ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश मुळे यांनी केले.

फुलंब्री येथील शासकीय विश्राम गृहावर औरंगाबाद राज्य ग्रामसेवक युनियन डी.एन.ई 136 ची औरंगाबाद जिल्हा कार्यकारणीची त्रिमासिक सभा रविवारी (ता.25) रोजी घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या सभेसाठी जिल्हा सरचिटणीस पुंडलिक पाटील, सुरेश काळवणे, प्रवीण नलवडे, भीमराज दाणे, ए.सी.पटेल, प्रवीण कुवर यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलतांना मुळे म्हणाले कि, शासनाच्या विविध योजनांची माहिती ग्रामीण भागातील घराघरात पोहचविण्याचे काम ग्रामसेवक संवर्ग करीत असतात. ग्रामसेवक हा शेतकरी व प्रशासन यांच्यातील दुवा आहे. याप्रसंगी तालुकाध्यक्ष ए.ए.पठाण, सचिव सुरेश चौधरी, विलास ढेंगे, रानोबा काथार, चंद्रकांत इंगोले, सागर डोईफोडे, भागीनाथ पेहरकर, रमेश पवार, आर.डी.तांबट, प्रदीप काळे, अरुण चित्ते, शांताराम काळे, कचरू जंगले, अवचित राऊतराय, आर.पी.जाधव, गणेश गरसोळे, कचरू देवकर, विनय आरमाळ, विलास हुमणे, कैलास गव्हलीकर, अमोल गायके, विलास मोहिते, समाधान वाघ, अजित गायकवाड आदींची मोठ्या संखेने उपस्थिती होती.

ग्रामसेवकाला पोलीस संवरक्षण द्या
तालुक्यातील कोलते टाकळी येथील अतिक्रमण काढण्याबाबत ग्रामसेवकांना पोलीस संवरक्षण व इतर प्रशासकीय सहकार्य शासनाकडून देण्याचा ठराव एक मताने पारित करण्यात आला. तसेच कंत्राटी ग्रामसेवकांचा तीन वर्षाचा सेवाकाळ नोकरीमध्ये धरल्याबाबतचा शासन निर्णय काढल्याने शासनाच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आले.

Web Title: Aurangabad news gramsevak in Phulambri