उत्पादन शुल्क विभागाचे झाले वस्तू व सेवाकर आयुक्‍तालय

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 जुलै 2017

औरंगाबाद - ‘जीएसटी’अंतर्गत शनिवारी (ता. एक) सिडको येथील केंद्रीय उत्पादन शुल्क, सेवाकर व सीमा शुल्क विभागाचे ‘वस्तू व सेवाकर आयुक्‍तालयात’ रूपांतर झाले. जीएसटी आयुक्‍त सी. एल. महर यांच्या हस्ते नव्या आयुक्‍तालयाच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. 

या वेळी ‘मसिआ’चे अध्यक्ष सुनील किर्दक, जिल्हा व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष सरदार हरिसिंग, ‘क्रेडाई’चे अध्यक्ष रवी वट्टमवार, ‘आयसीएमएआय’चे अध्यक्ष विश्‍वेश्‍वर सेन, टॅक्‍स प्रॅक्‍टिशनर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष आलोक सिंग यांची प्रमुख उपस्थिती होती. आयुक्‍त श्री. महर म्हणाले, की दहा महिन्यांपासून विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी या नव्या करप्रणालीची अंमलबजावणी सुरळीत व्हावी म्हणून मेहनत घेत आहेत. कायदा नवीन असल्यामुळे सुरवातीला काही अडचणी जाणवतील. लोकांची मानसिकता बदलण्यास थोडा वेळ लागेल.

Web Title: aurangabad news GST Excise duty