ई-मेल हॅक करून बॅंकेला गंडा 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 जुलै 2018

औरंगाबाद - देवगिरी बॅंकेचा ई-मेल हॅक करून आयडीबीआय बॅंकेला आरटीजीएसद्वारे दहा लाखांची मागणी करीत मथुरेतील भामट्याने गंडवले. मात्र, फसवणूक लक्षात येईपर्यंत त्या भामट्याने दहा लाखांपैकी तीन लाख ६० हजार रुपये बॅंक खात्यातून काढले होते. 

आयडीबीआय बॅंक व देवगिरी बॅंकेत नेहमीच कराराअंतर्गत व्यवहार होतो. त्याचाच फायदा घेत शुक्रवारी (ता. सहा) सकाळी सव्वादहा ते दुपारी साडेबाराच्यादरम्‍यान समर्थनगरातील आयडीबीआय बॅंकेचे सहायक शाखा व्यवस्थापक सुशील श्रीकृष्ण पांडे यांना मथुरेतील भामट्याने शुक्रवारी देवगिरी बॅंकेचा ई-मेल आयडी हॅक करत मेलद्वारे संपर्क साधला. त्यात या भामट्याने एचडीएफसी बॅंकेच्या खाते क्रमांकाचा उल्लेख करून त्यावर दहा लाख रुपये आरटीजीएस करण्याचे नमूद केले. नेहमीचा व्यवहार असल्याने शाखा व्यवस्थापक पांडे यांनी दहा लाख रुपये पाठवून दिले. त्यानंतर व्यवस्थापनाने खात्री करण्यासाठी देवगिरी बॅंकेत संपर्क साधला तेव्हा गंडविल्याचे लक्षात आले. पांडे यांनी क्रांती चौक पोलिस ठाण्यात धाव घेतली. तेव्हा तो भामटा मथुरा येथील असल्याचे समोर आले. त्याने दिल्लीवरून खात्यातील तीन लाख ६० हजार रुपये काढले. त्याचे एचडीएफसी बॅंकेचे खाते तात्पुरते बंद करीत या प्रकरणाची माहिती सायबर सेलला देखील याबाबत कळविण्यात आल्याचे निरीक्षक अनिल गायकवाड यांनी सांगितले.

Web Title: aurangabad news hacking e-mail