‘एमजीएम’मध्ये अवतरले ‘तारे जमीं पर’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जुलै 2017

औरंगाबाद - ‘इतनीसी हसी... इतनीसी खुशी... इतनासा तुकडा चांद का’, ‘उडी उडी जाय, नन्हीसी चिडियाँ,’ अशा एक ना अनेक गाण्यांच्या तालावर नृत्य करून मूकबधिर अपंगांनी अक्षरश: सभागृहाला बेधुंद केले. 

निमित्त होते डॉ. श्रीकांत जिचकार फाउंडेशनच्या ‘प्रोजेक्‍ट हॅप्पीनेस’ कार्यक्रमाचे. ‘एमजीएम’च्या रुक्‍मिणी सभागृहामध्ये रविवारी (ता. नऊ) हा बहारदार कार्यक्रम झाला. 

एमजीएमचे सचिव अंकुशराव कदम, अनुराधा कदम, प्रतापराव बोराडे, सुशीला बोराडे, मधुकरअण्णा मुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या संस्थेतर्फे सर्व पाहुण्यांचे रोपटे देऊन स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमात सहा ते अठरा वयोगटातील दोनशे वीस अनाथ, मूकबधिर, अपंग मुला-मुलींनी भाग घेतला. त्यांनी सादर केलेल्या कलागुणांनी सभागृहाला खिळवून ठेवले. जिजामाता अनाथाश्रम, आरंभ सेंटर, भगवानबाबा बालगृह, योगेश्‍वरी बालकाश्रम, नाथ अस्थिव्यंग विद्यालय, आनंद मूकबधिर विद्यालयाच्या मुला-मुलींचा यात सहभाग होता. डॉ. श्रीकांत जिचकार फाउंडेशन झिरो ग्रॅव्हीटीजचे दीडशे ते दोनशे स्वयंसेवक एक महिन्यापासून अपंग, अनाथ, मूकबधिर विद्यार्थ्यांची तयारी करून घेत होते. जिजामाता अनाथाश्रमाच्या मुला-मुलींनी ‘नन्हीसी चिडियाँ’ या गाण्यावर नृत्य करीत प्रेक्षकांना खिळवून ठेवले. आनंद मूकबधिर संस्थेच्या मुलांनी ‘कृष्ण जन्मला...’ या मराठी गाण्यावर अचूक ठेका धरला. मूकबधिर विद्यार्थ्यांनी, स्टेजच्या बाजूला असलेल्या त्यांच्या शिक्षिकांनी केलेल्या हातवाऱ्याच्या आधाराने बहारदार सादरीकरण केले. शिक्षकांचे हावभाव टिपत मूकबधिर विद्यार्थी बोलक्‍यांनाही लाजवतील असे नृत्य करू शकतात, स्वराज सरकटे, साहिल सोनार व भगवानबाबा अनाथाश्रमाच्या मुलींनीही गीते सादर केली. ईशा मुळे यांनी प्रास्ताविक केले. निहारिका कपूर आणि अस्मिता यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमासाठी मैत्री जिचकार, याज्ञवल्क्‍य जिचकार, रोहित देशमुख, अविनाश मुथियान, अश्‍विनी महाजन, सारा पाटील, कुश महाजन यांनी पुढाकार घेतला.

Web Title: aurangabad news handicap