प्रदीप जैस्वाल यांच्या जामीनवरील सुनावणी पूर्ण 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

औरंगाबाद - माजी खासदार प्रदीप जैस्वाल यांच्या नियमित जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण झाली असून, आदेशासाठी निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. शहरात 11 मेरोजी उसळलेल्या दंगल प्रकरणातील तरुणांना जामिनावर सोडून देण्याची मागणी करत जैस्वाल यांनी क्रांती चौक पोलिस ठाण्यात गोंधळ घातला होता. या प्रकरणी त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. जैस्वाल यांनी ऍड. के. जी. भोसले यांच्यामार्फत नियमित जामीनसाठी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला. या जामीन अर्जावर बुधवारी (ता.23) अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. एस. महाजन यांच्या समोर सुनावणी झाली.

औरंगाबाद - माजी खासदार प्रदीप जैस्वाल यांच्या नियमित जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण झाली असून, आदेशासाठी निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. शहरात 11 मेरोजी उसळलेल्या दंगल प्रकरणातील तरुणांना जामिनावर सोडून देण्याची मागणी करत जैस्वाल यांनी क्रांती चौक पोलिस ठाण्यात गोंधळ घातला होता. या प्रकरणी त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. जैस्वाल यांनी ऍड. के. जी. भोसले यांच्यामार्फत नियमित जामीनसाठी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला. या जामीन अर्जावर बुधवारी (ता.23) अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. एस. महाजन यांच्या समोर सुनावणी झाली. दरम्यान, दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेऊन सदर प्रकरण आदेशासाठी राखीव ठेवण्यात आले. 

Web Title: aurangabad news Hearing on bail for Pradeep Jaiswal