ऐतिहासिक दरवाजाचे निखळले चिरे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जानेवारी 2018

औरंगाबाद - राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा असलेल्या दौलताबादेतील देवगिरी किल्ल्याच्या कमानीची ट्रकच्या धडकेने पुन्हा पडझड झाली आहे. उंच ट्रकच्या धडकेमुळे या दरवाजाचे चिरे निखळले असून येथून प्रवास करणाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. 

औरंगाबाद शहरातून धुळ्याकडे जाणऱ्या महामार्गाचा काही भाग दौलताबाद किल्ल्याच्या पुरातन तटबंदीतून जातो. या किल्ल्यासमोरून घाटाकडे जाणाऱ्या या रस्त्यावर असलेल्या वाटेत किल्ल्याचे जुने प्रवेशद्वार आहे. हे प्रवेशद्वार सध्या आपल्या सुरेख बनावटीमुळे नाही, तर ट्रकच्या धडकांमुळेच अधिक चर्चेत राहते आहे. मंगळवारी (ता. नऊ) ट्रकने पुन्हा एकदा या दरवाजाला जोराची धडक दिली. त्याचा थेट धक्‍का या दरवाजाच्या कमानीला लागला. या धक्‍क्‍याने कमानीचे १० ते १५ चिरे निखळून पडले आहेत. दररोज बसणाऱ्या या धडकांनी दरवाजाचे नुकसान होते आहे. दौलताबाद किल्ल्याला वळसा घालून जाणाऱ्या नव्या रस्त्याचे काम प्रस्तावित अहे; पण हे काम अद्याप सुरू झालेले नसल्याने वाहनांची ही ये-जा याच ऐतिहासिक दरवाजातून सुरू आहे. हे काम लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी होत आहे.

Web Title: aurangabad news historical door damage