पत्नीला घाटीत सोडून पळालेला पती अटकेत 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 मे 2018

औरंगाबाद - पतीने मारहाण केल्याने गंभीर जखमी झालेल्या अर्चना मनोज फिरंगे (28, रा. बेगमपुरा) यांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. 20) रात्री अकराच्या सुमारास घडली होती. त्यानंतर फरार झालेला पती मंगळवारी (ता. 22) घाटी रुग्णालयाच्या मेडिकल इमारतीसमोर येताच त्याला निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सरफराज यांनी सुरक्षारक्षकांच्या मदतीने पकडून बेगमपुरा पोलिसांच्या ताब्यात दिले. 

मनोज फिरंगे असे या पतीचे नाव असून तो घाटी रुग्णालयात सफाई कामगार आहे. बेगमपुरा पोलिसांनी माहिती दिली, की अर्चना व मनोज यांचे घाटी रुग्णालयातील पोलिस चौकीजवळ कडाक्‍याचे भांडण झाले होते. यावेळी मनोज दारूच्या नशेत होता. त्याने तिला मारहाण केल्याने अर्चना गंभीर जखमी झाली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर तो पसार झाला होता. 

दरम्यान, उपचारादरम्यान अर्चनाचा सोमवारी (ता. 21) सकाळी साडेसातच्या सुमारास मृत्यू झाला. याप्रकरणी पतीविरुद्ध बेगमपुरा पोलिस ठाण्यात खुनाच्या आरोपाखाली गुन्ह्याची नोंद करण्यात आली. त्यानंतर मंगळवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास डॉ. सरफराज हे फिरतीवर असताना त्यांना मेडिकल विभागाच्या इमारतीसमोर मनोज दिसला. तसेच लोकांनीदेखील हा मनोजच असल्याचे सांगितले. त्यानंतर श्री. धनाजी, श्री. दिवटे, श्री. राठोड यांच्या मदतीने त्यास पकडून बेगमपुरा पोलिस ठाण्याचे श्री. पटेल यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत त्याला अटक करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Web Title: aurangabad news husband arrested

टॅग्स