चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून करून पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

औरंगाबाद: चारित्र्याचा संशयावरून पतीने पत्नीच्या डोक्यात हातोडा घालून निर्घृण खून केला. त्यानंतर त्याने फरशी कापण्याच्या कटरने स्वतःच्या गळा कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही गंभीर घटना बुधवारी (ता. 4) मध्यरात्री घडली.

पोलिस निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्पना हरिओमदास बैनाडे (वय 27) असे मृत पत्नीचे नाव आहे. हरिओमदास गोविंददास बैनाडे (वय 32) असे पतीचे नाव आहे. तो गवंडी काम करतो, मृत पत्नी एका खासगी रुग्णालयात सफसफाईचे काम करीत होती. हरिओमदास कल्पनावर सतत चारित्र्यावरून संशय घेत होता. यातून दोघांचे अनेकदा भांडणे होत असत. बुधवारी रात्री भांडण करून दोघे झोपी गेले. त्यानंतर रात्री एकच्या सुमारास हरिओमदास उठला व त्याने पत्नीच्या डोक्यात हातोडा घातला यातच कल्पना गतप्राण झाली. आवाज झाल्याने त्यांची तिन्ही मुले उठली पण त्यांना शांत बसण्याचे धमकावत हरिओमदासने फरशी कापन्याच्या कटरने स्वतःचा गळा चिरला. हि बाब मुलांनी जवळच राहणाऱ्या मामा व आजीला सांगितली.

घटनास्थळी नातलग व हर्सूल ठाणे पोलिस आले, त्यांनी दोघांना घाटी रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी कल्पनाला मृत घोषित केले असून, हरिओमदासवर उपचार सुरु आहेत.

Web Title: aurangabad news The husband's suicide attempt by killing his wife