पूर्णेच्या पात्रातून अवैध वाळू नेणारे 2 ट्रॅक्टर जप्त

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 जून 2017

दोन ट्रॅक्टरच्या पावत्या नसल्याने ते दोन ट्रॅक्टर वडोदबाजार पोलिस ठाण्यात जमा करण्यात आले.

निल्लोड : सिल्लोड तालुक्यातील भवन-चिंचखेडा (जि. औरंगाबाद) येथील पूर्णा नदीच्या पात्रातून वाळू वाहतूक करणारे चार ट्रॅक्टर बुधवारी (ता. २८) सकाळी अकराच्या सुमारास वडोदबाजार पोलिसांनी पकडले.

वडोदबाजार पोलिस ठाण्याचे सह पोलिस निरीक्षक साईनाथ रामोड यांनी केलेल्या कारवाईत चारपैकी दोन ट्रॅक्टरच्या चालकाकडे रॉयल्टीच्या पावत्या असल्याने ते सोडून देण्यात आले. तर दोन ट्रॅक्टरच्या पावत्या नसल्याने ते दोन ट्रॅक्टर वडोदबाजार पोलिस ठाण्यात जमा करण्यात आले.

यावेळी वाहतूक करणाऱ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने वजन वापरून सोडविण्यासाठी प्रयत्न केला. वाळूचे ट्रॅक्टर पकडल्याची माहिती मिळाल्यानंतर नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केली होती.

Web Title: aurangabad news illegal sand mafia tractors seized