प्राप्तिकर अधिकारी सीबीआयच्या जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 मार्च 2018

औरंगाबाद - दोन लाखांची लाच घेताना प्राप्तिकर अधिकारी शशिकांत कोठावदे यांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केली. कर निर्धारित करण्यासंदर्भात त्यांनी एका व्यावसायिकाला लाच मागितली होती. शहरातील उस्मानपुरा भागात एका कापड व्यावसायिकाने आपल्या संपूर्ण व्यवहाराचे विवरण प्राप्तिकर विभागाला दिले होते; परंतु त्यांच्या विवरणाबाबत सिडकोतील प्राप्तिकर कार्यालयातील वॉर्ड क्रमांक तीनचे (अ) प्राप्तिकर अधिकारी कोठावदे यांना संशय आला. त्यांनी या प्रकरणात दंडात्मक कारवाई थांबवून प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी व्यावसायिकाला दोन लाखांची मागणी केली होती.
Web Title: aurangabad news income tax officer arrested by cbi in bribe case