औरंगाबादेत उद्योगांची वाढ अटळ : देसाई

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 ऑक्टोबर 2017

भविष्य ई वाहनांचे
आगामी काळात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर अपरिहार्य होणार असून इ वाहनांच्या संशोधनात सध्या कंपन्यांनी मोठी ताकद झोकली आहे. या वाहनांसाठी लागणाऱ्या सुट्ट्या भागांसाठी ऑटो उद्योगात आणि इलेक्ट्रॉनिक उद्योगाला मोठी संधी आहे असे श्री. देसाई यांनी सांगितले.

औरंगाबाद : व्हेंडर एकोसिस्टिम विकसित करून उभी राहिलेली औरंगाबादेतील औद्योगिक वसाहत हे दुर्मिळ उदाहरण आहे. येथे उद्योगांचा विकास अटळ असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले केले. 

 सीएमआयएच्या वतीने आयोजित देवगिरी इलेक्ट्रॉनिक क्लस्टरच्या भूमिपूजन प्रसंगी ते शेंद्रा येथे बोलत होते.  ते म्हणाले, औरंगाबाद आणि या लागत असलेली एकोसिस्टिम आणि व्हेंडरची यंत्रणा उत्तम विकसित झाली आहे. येथील विकास पाहून मोठ्या उद्योगांना यावेच लागणार असल्याचे मत सुभाष देसाई यांनी व्यक्त केले. सिडपार्क तयार कारण्यासाठीही सरकारने जालना येथे पुढाकार घेतला आहे. स्वीडन येथील तीन दिवसाच्या दौऱ्यात आपण आणि मुख्यमंत्र्यांनी पुरेपूर मार्केटिंग केले आहे असे सांगत तेथे नेमक्या कोणत्या कंपन्यांशी वैयक्तिक चर्चा झाली हे मात्र त्यांनी सांगितले नाही. येथील औद्योगिक वसाहतीच्या अनेक अडचणी आहेत. त्या केवळ एक बैठकीत संपणार नाही तर त्यासाठी आराखडा आणि पाठपुरावा करून मार्गी लावू असे देसाई यांनी पुढे सांगितले. 

भविष्य ई वाहनांचे
आगामी काळात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर अपरिहार्य होणार असून इ वाहनांच्या संशोधनात सध्या कंपन्यांनी मोठी ताकद झोकली आहे. या वाहनांसाठी लागणाऱ्या सुट्ट्या भागांसाठी ऑटो उद्योगात आणि इलेक्ट्रॉनिक उद्योगाला मोठी संधी आहे असे श्री. देसाई यांनी सांगितले.

Web Title: Aurangabad news industry in Aurangabad