भिक्‍खू संघाचे उपोषण सुटले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जानेवारी 2018

औरंगाबाद - कोरेगाव भीमा येथील घटनेनंतर पोलिसांनी आंबेडकरी तरुणांना लक्ष्य केले, असा आरोप करीत भिक्‍खू संघातर्फे सुरू करण्यात आलेले उपोषण चौथ्या दिवशी रविवारी (ता. 14) सुटले. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी उपोषणस्थळी भेट देऊन मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा, काही मागण्यांसाठी तातडीची बैठक घेणार असल्याचे सांगितले. यानंतर ज्यूस देऊन उपोषणाची सांगता करण्यात आली.
Web Title: aurangabad news khikshu sangha fasting