कोपर्डी प्रकरणातील अर्जावर सुनावणी पूर्ण 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जुलै 2017

औरंगाबाद - कोपर्डी (जि. नगर) येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व खून प्रकरणात सहा साक्षीदार तपासण्यास परवानगी देण्याची विनंती करणाऱ्या फौजदारी पुनर्निरीक्षण अर्जावर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती के. के. सोनवणे यांच्यासमोर सुनावणी पूर्ण झाली. हे प्रकरण निकालासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. 

कोपर्डी प्रकरणातील संशयीत संतोष भवाल याने बचाव पक्षाचे सहा साक्षीदार तपासण्याची परवानगी मिळावी, असा अर्ज सत्र न्यायालयात केला होता. या साक्षीदारांमध्ये विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, नगरचे जिल्हाधिकारी, वैद्यकीय प्रयोगशाळा संचालक, न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे सहायक संचालक, माध्यमांचे प्रतिनिधी, सीडी तयार करणाऱ्या व्यक्ती यांचा समावेश होता. संतोष भवालने केलेल्या अर्जात म्हटले आहे की, आपल्याला या प्रकरणात खोटेपणाने गोवण्यात आले आहे. बचावाच्या संधीसाठी विनंती करण्यात आलेल्या व्यक्तींच्या साक्षी तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामध्ये मराठा मुक्ती मोर्चाने जिल्हाधिकारी नगर यांना या प्रकरणाबाबत निवेदन दिलेले असल्याने त्यांची साक्ष महत्त्वाची असल्याचे म्हटले होते. 

दरम्यान खटला लांबविण्यासाठीच ही मागणी करण्यात आली असून, ती फेटाळून लावण्याची विनंती न्यायालयात करण्यात आली. याप्रकरणी सुनावणी पूर्ण झाल्यानंतर खंडपीठाने प्रकरण निकालासाठी राखीव ठेवले. अर्जदारतर्फे ऍड. राकेश राठोड, ऍड. विजयालक्ष्मी खोपडे, सरकारतर्फे सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी काम पहिले.

Web Title: aurangabad news Kopardi case