बंद मोबाईल इंटरनेटसेवेमूळे औरंगाबादेत परिस्थिती नियंत्रणात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 जानेवारी 2018

औरंगाबाद : मोबाईल इंटरनेटसेवा बंद झाल्यानंतर औरंगाबादेत कायदा व सुव्यवस्थेला थोडी बळकटी मिळाली असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा लाभ होत आहे. काही खासगी टेलिकॉम कंपन्यांच्या इंटरनेट सेवा मंगळवारी (ता. दोन) मध्यरात्रीपासून बंद करण्यात आली आहे.

एका खासगी कंपनीची मोबाईल इंटरनेट सेवा वगळता इतर सरकारी वखासगी कंपन्यांच्या पुर्णत: मोबाईल इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. यात औरंगाबाद शहर, वाळूज, रांजणगाव शेणपूंजी, सातारा परिसर, हर्सूल, चिकलठाणा आदी ठिकाणचा समावेश आहे. सोशल मिडियाद्वारे पडणारा अफवांचा पाऊस थांबला असून असे अफवोंचे मॅसेजस पडत नसल्याने कायदा व सुव्यवस्थेला थोडीशी बळकटी मिळत आहे. तसेच परिस्थिती नियंत्रणात येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

Web Title: aurangabad news koregaon bhima issue and aurangabad mobile network ban