मुस्लिम समाजासाठीही ॲट्रॉसिटी कायदा लागू करा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 जुलै 2017

लातूर - गोरक्षा व अन्य कारणांवरून देशभरातील मुस्लिमांवर हल्ले होत आहेत. या हल्ल्यांत मुस्लिम समाजातील नागरिक व युवकांचा नाहक बळी जात आहे. हल्ल्यांच्या निषेधार्थ व मुस्लिमांच्या संरक्षणासाठी मुस्लिम समाजाला ॲट्रॉसिटी कायदा लागू करावा, या मागणीसाठी मुस्लिम विकास परिषदेच्या वतीने बुधवारी (ता. पाच) गांधी चौकात धरणे आंदोलन करण्यात आले.

आंदोलनाच्या ठिकाणी मुस्लिमांच्या हक्काचे संरक्षण करण्यात अपयशी ठरलेले अल्पसंख्याक आयोग, केंद्र व राज्य सरकार, तसेच विरोधी पक्ष झोपेचे सोंग घेत असल्याचा सजीव देखावा करण्यात आला होता. आंदोलनाच्या बॅनरवर आजपर्यंत हल्ल्यांत मृत्युमुखी पडलेल्या मुस्लिम नागरिक व युवकांची चित्रे देऊन हल्ल्याची दाहकता दाखविण्याचा प्रयत्न झाला होता. परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मोहसीन खान यांनी नेतृत्व केले. आंदोलनानंतर मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

Web Title: aurangabad news latur autrocity act