एकतर्फी प्रेमातून जिवलग मित्राचा खून 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

औरंगाबाद - प्रेमप्रकरणातून एका युवकाने जिवलग मित्राचा गळा घोटून खून केल्याची घटना गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास जयसिंगपुरा येथील रामेश्वर अपार्टमेंटमध्ये घडली. मित्राच्या प्रेयसीवर असलेल्या एकतर्फी प्रेमातून हा प्रकार घडला. दरम्यान, खुनानंतर मारेकरी दोन तास मृतदेहाजवळ बसून होता. सहाच्या सुमारास तो बेगमपुरा पोलिस ठाण्यात हजर झाला आणि त्याने स्वतः घडलेला प्रकार सांगितला. 

अजय शत्रुघ्न तिडके (वय 22, रा. शहापूर, ता. खामगाव, जि. बुलडाणा) असे मृताचे, तर मंगेश सुदाम वायवळ (वय 27, रा. समासापूर, ता. जि. परभणी) असे संशयित आरोपीचे नाव आहे. अकरावीत असताना अजयची मंगेशशी भेट झाली होती. तेव्हापासून दोघे एकाच खोलीत राहत होते. अजयचे एका मुलीवर प्रेम होते. ही बाब अजयने मंगेशला सांगितली होती. अजयच्या प्रेयसीवर मंगेशही एकतर्फी प्रेम करू लागला. ही बाब अजयच्या लक्षात आल्यानंतर दोघांत अनेकदा वाद झाले. 

अजयला मारण्याच्या हेतूने बुधवारी (ता.4) रात्री मंगेश त्याच्या खोलीत गेला. पहाटे चारपर्यंत दोघांमध्ये वाद चालला; अजयने प्रेयसीला सोडण्यास नकार दिला. अखेर मंगेशने अजयचा पट्ट्याने गळा घोटून खून केला. मंगेशला पोलिसांनी अटक केली असून, याप्रकरणी खुनाच्या गुन्ह्याची नोंद झाली. 

Web Title: aurangabad news Love affair murder

टॅग्स