तरुण-तरुणीने घेतली रेल्वेखाली उडी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जुलै 2017

तरुण ठार, तरुणीवर उपचार सुरू, नगर रस्ता उड्डाणपुलाजवळील प्रकार 

औरंगाबाद - तरुण-तरुणीने रेल्वेखाली उडी घेतल्याचा गंभीर प्रकार नगर रस्त्यावरील गोलवाडीलगत उड्डाणपुलाखाली घडला. यात तरुण जागीच ठार झाला, तर विवाहित तरुणी बालंबाल बचावली. तिच्यावर ‘घाटी’ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना रविवारी (ता. २३) दुपारी तीनच्या सुमारास घडली. 

आकाश रेवाजीनाथ पवार (वय २२, रा. जयभवानीनगर, गल्ली क्रमांक सात) असे मृत तरुणाचे नाव असून, त्याचे वडील गवंडीकाम करतात. तरुणी विवाहित असल्याची माहिती समोर आली आहे. 

पोलिसांनी सांगितले की, आकाश व ती विवाहीत तरुणी दुपारी एकमेकांना भेटले. त्यानंतर ते नगरनाका येथे गेले. उड्डाणपुलाखाली मनमाडहून औरंगाबादकडे जाणाऱ्या मालगाडीखाली त्यांनी उडी घेतली. यात आकाश पवार चिरडला गेला, तर विवाहित तरुणीच्या पायाला गंभीर जखम झाली. या घटनेनंतर लोहमार्ग पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर तरुण-तरुणीला तातडीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्‍टरांनी आकाशला तपासून मृत घोषित केले. जखमी विवाहित तरुणीवर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर आकाशच्या मित्रांनी घाटीत धाव घेतली. मित्राच्या मृत्यूने ते हादरून गेले. त्यांना अश्रू आवरता आले नाहीत. दरम्यान या घटनेविषयी पोलिस विचारपूस करीत आहेत. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला. घटनेची नोंद छावणी पोलिस ठाण्यात झाली. 

अशी पटली ओळख..
पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. त्यादरम्यान त्यांना मोबाईल व कागदपत्रे सापडली. यावरून त्यांची ओळख पटली. आकाश गेल्या आठ दिवसांपूर्वी पुणे येथे नोकरी शोधण्यासाठी जातो म्हणून घरातून गेला होता. त्याने वडिलांना नऊ हजार रुपये पगाराची नोकरी मिळाल्याचे सांगितले; परंतु दोन दिवसांपासून त्याचा फोन लागत नव्हता. 

नातेवाईक पोचले नाहीत..
विवाहित तरुणी गंभीर जखमी असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत. रात्री उशिरापर्यंत तिचे नातेवाईक घाटीत पोचले नव्हते. त्यामुळे तिच्याबाबतची माहिती पोलिसांना कळू शकली नाही. नातेवाईक आल्यानंतर त्यांचा जबाब घेतला जाईल, असे छावणी पोलिसांनी सांगितले.

लोकोपायलट, पोलिसांची मदत..
तरुणी व आकाश यांनी औरंगाबाद-नगर रस्त्यावरील गोलवाडी फाट्यालगत रेल्वे उड्डाणपुलाखाली उडी घेतली. ही बाब मालगाडीच्या लोकोपायलटला दिसल्यानंतर त्यांनी तत्काळ गाडी थांबविली. त्यानंतर लोकोपायलटने घटनेची माहिती लोहमार्ग पोलिसांना देऊन तिला रेल्वेस्थानकावर आणले. तिला ‘घाटी’ त उपचारासाठी हलविण्यात आले.

Web Title: aurangabad news lovers death in railway accident