महावितरणची पाणीपुरवठ्याची कोट्यवधीची थकबाकी 

अनिल जमधडे 
बुधवार, 21 मार्च 2018

महापालिकेने भरले अडीच कोटी 
औरंगाबाद महापालिकेचे औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करण्याठी जायकवाडी, फारोळा व नक्षत्रवाडी येथे पंप हाऊस आहेत. या पंपहाऊसच्या विजपुरवठ्याच्या एकुण थकबाकी पैकी महापालिकेने दोन कोटी 55 लाख रुपये भरले आहेत. आता महापालिकेकडे तीन कोटी 98 लाख रुपयांची थकबाकी शिल्लक आहे. ही थकबाकी भरण्यासाठी महावितरणतर्फे पाठपुरावा करण्यात येत आहे. 

औरंगाबाद : महावितरणची औरंगाबाद महापालिकेसह विविध नगर परिषद व ग्रामपंचायत कार्यालयांकडे पाणीपुरवठ्याची चाळीस कोटी पेक्षा अधिक थकबाकी झाली आहे. औरंगाबाद महापालिकेने अडीच कोटी रुपयांची थकबाकी भरले आहेत. मात्र औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील अन्य नगरपरिषद व ग्रामपंचायतींना पाणीपुरवठ्याची वीज पुरवठा तोडण्याचा इशारा महावितरणने दिला आहे. 

महावितरणची मोठ्या प्रमाणावर थकबाकी असल्याने वसुली मोहिमेवर लक्ष देण्यात येत आहे. नागरी, औद्योगीक थकबाकी बरोबरच विविध गावांच्या पाणीपुरठा योजनांचीही मोठी थकबाकी आहे. औरंगाबाद शहर मंडळात असलेल्या 26 अस्थापनांकडे 38 लाख 80 हजार रुपये थकबाकी आहे. तर औरंगाबाद ग्रामिण मंडळात 1294 ग्रामपंचायत व काही नगरपरिषदा आहेत. त्यांच्याकडे तब्बल 39 कोटी 37 लाख 60 हजार रुपयांची थकबाकी झाली आहे. त्याचप्रमाणे जालना जिल्ह्यात 980 ग्रामपंचायतींकडे तब्बल 22 कोटी बारा लाख 34 हजार रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी भरण्यासाठी मुख्य अभियंता अभियंता सुरेश गणेशकर यांनी पाठपुरावा सुरु केला आहे. वारंवार पाठपुरावा करुनही थकबाकी भरण्यासाठी संबंधीत अस्थापना तत्परता दाखवत नाही, त्यामुळे अशा ग्रामपंचायत, नगरपरिषदांच्या पाणीपुरवठ्याची विजपुरवठा खंडीत करण्यात येणार असल्याचे श्री. गणेशकर यांनी सांगीतले. 

महापालिकेने भरले अडीच कोटी 
औरंगाबाद महापालिकेचे औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करण्याठी जायकवाडी, फारोळा व नक्षत्रवाडी येथे पंप हाऊस आहेत. या पंपहाऊसच्या विजपुरवठ्याच्या एकुण थकबाकी पैकी महापालिकेने दोन कोटी 55 लाख रुपये भरले आहेत. आता महापालिकेकडे तीन कोटी 98 लाख रुपयांची थकबाकी शिल्लक आहे. ही थकबाकी भरण्यासाठी महावितरणतर्फे पाठपुरावा करण्यात येत आहे. 

Web Title: Aurangabad news Mahavitran balance