कचरा डेपो हटवा, अन्यथा फाशी घेऊ...

माधव इतबारे
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

औरंगाबादेत पेटले आंदोलन; संतप्त नागरिकांनी अडविल्या महापालिकेच्या गाड्या

औरंगाबादः मांडकी येथील कचरा डेपो हटविण्याच्या मागणीसाठी संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले असून, आज (शुक्रवार) महापालिकेच्या गाड्या अडवत आंदोलन सुरू करण्यात आले. शेतकऱ्याच्या जन्माला येऊन आम्ही पाप केले. आधी निसर्ग मारतो नंतर शासन. त्यात या कचरा डेपोमुळे आमचे आयुष्य उद्‌ध्वस्त होत आहे. जगण्यापेक्षा फाशी घेतलेली बरी असा इशारा देत आता माघार नाही, असा निर्धार यावेळी करण्यात आला.

शहरापासून जवळच असलेल्या नारेगाव (मांडकी) येथील कचरा डेपो हटविण्याची मागणी नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून करत आहेत. महापालिका शहरात निघणारा सुमारे साडेचारशे टन कचरा दररोज या ठिकाणी टाकते. मात्र, त्यावर कुठलीही प्रक्रिया करण्यात येत नसल्याने 43 एकर जागेवर कचऱ्याचे डोंगर निर्माण झाले आहेत. हवा, पाण्याचे प्रदूषण वाढले असून, परिसरातील तेरा गावातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. कचरा डेपो हटविण्यासंदर्भात न्यायालयाने 2003 मध्ये आदेश दिले आहेत. मात्र, अद्याप महापालिकेला इतरत्र जागा मिळालेली नाही. वारंवार केवळ आश्‍वासने मिळत असल्याने आता कचरा डेपो हटविल्याशिवाय माघार नाही, असा निर्धार करत शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. कचराडेपोकडे जाणाऱ्या गाड्या सकाळी सात वाजल्यापासून अडवून धरण्यात आल्या.

दरम्यान, महापौर भगवान घडामोडे, आयुक्त डी. एम. मुगळीकर यांच्यासह नगरसेवक, अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. दिल्लीपासून महापालिकेपर्यंत भाजपचे सरकार आहे. रात्रीपर्यंत आमचा प्रश्‍न सोडवा, अशी गळ यावेळी महापौरांना घालण्यात आली. आम्ही दिवाळी साजरी करणार नाही आणि तुम्हाला खाऊ देणार नाही. प्रश्‍न मिटला नाही तर कचरा आयुक्‍तांच्या बंगल्यावर, महापौरांच्या घरी टाकू, माघार घेणार नाही, असा इशारा देण्यात आला.

Web Title: aurangabad news mandki garbage depot issue