आंबेडकर भवनप्रकरणी औरंगाबादमध्ये दलित संघटनांचा मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 जून 2017

■ अशा आहेत मागण्या

  • मुंबईला दाखल झालेल्या गुन्ह्यात रत्नाकर गायकवाड यांना अटक करावी.
  • रत्नाकर गायकवाड यांचा अनेक भ्रष्टाचारांत सहभाग उघड झाल्याने त्यांची चौकशी करावी.
  • तत्कालीन पोलिस आयुक्त अमितेशकुमार व पोलिस निरीक्षक वसीम हाश्‍मी यांनी कार्यकर्त्यांवर गंभीर गुन्हा दाखल केले, त्याची न्यायालयीन चौकशी करावी.
  • शेतकऱ्यांची दिशाभूल न करता सरसकट कर्जमाफी द्यावी.
  • कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्या

औरंगाबाद - मुंबईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन पाडल्याच्या निषेधार्थ शासनाच्या विरोधात आज (रविवार) शहरात भव्य मोर्चा काढण्यात आला. यात विविध दलित संघटना, डावे, पुरोगामी पक्षाचे नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. माजी माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांच्यावर कारवाई न करता त्यांना पाठीशी घालणाऱ्या राज्य सरकारचा यावेळी धिक्कार करण्यात आला.

आंबेडकर भवन व बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस या ऐतिहासिक इमारती 25 जून 2016 ला तत्कालीन माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी रात्रीतून उद्‌ध्वस्त केल्या. याप्रकरणी गुन्हा दाखल होऊनही गायकवाड यांच्यावर कारवाई झाली नाही. या घटनेला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त दलित संघटनांतर्फे "ब्लॅक डे' पाळण्यात आला. क्रांती चौक ते भडकलगेट असा "आंबेडकर भवन बचाव मोर्चा' रविवारी दुपारी काढण्यात आला.

■ अशा आहेत मागण्या

  • मुंबईला दाखल झालेल्या गुन्ह्यात रत्नाकर गायकवाड यांना अटक करावी.
  • रत्नाकर गायकवाड यांचा अनेक भ्रष्टाचारांत सहभाग उघड झाल्याने त्यांची चौकशी करावी.
  • तत्कालीन पोलिस आयुक्त अमितेशकुमार व पोलिस निरीक्षक वसीम हाश्‍मी यांनी कार्यकर्त्यांवर गंभीर गुन्हा दाखल केले, त्याची न्यायालयीन चौकशी करावी.
  • शेतकऱ्यांची दिशाभूल न करता सरसकट कर्जमाफी द्यावी.
  • कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्या

Web Title: aurangabad news marathi news ratnakar gaikwad agiation