‘देशाचे भवितव्य’ ताटकळले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 जुलै 2017

औरंगाबाद - कोणत्याही सरकारी कार्यक्रमात हक्काचे पाहुणे म्हणून शाळकरी मुले गाडीत भरून आणली जातात. मंत्रीसंत्री आपल्या ‘कार्यबाहुल्या’मुळे नियोजित वेळेपेक्षा हमखास उशिरा येतात. या कार्यक्रमातही तसेच झाले. दौलताबादच्या देवगिरी विद्यालयाची दोनशेवर मुले बसमधून सकाळी नऊपासूनच उघड्या माळावर आणून बसविली होती त्यांच्यासाठी ‘पिण्याच्या पाण्याची’ उत्तम व्यवस्था केली असली, तरी कार्यक्रम झाल्यावर ‘खाण्याची’ व्यवस्था करण्यात येईल, असे सांगण्यात आले. 

दहा वाजले, अकरा वाजले, बारा वाजून गेले, तरी मंत्री येत नाहीत, हे पाहून काहींनी दप्तरातून सोबत आणलेले डबे खाल्ले. वनविभागाने केळी आणि थोडासा फराळ दिला. शाळेच्या मॉनिटरची मुलांना गप्प करता करता तारांबळ उडत होती. एक वाजता मंत्र्यांचे आगमन झाले. या नव्या पिढीच्याच खांद्यावर ‘देशाचे भवितव्य’ आहे, अशा शब्दांत त्यांनी भाषणाला सुरवात केली. तासाभरात कार्यक्रम संपताच कंटाळलेल्या, घराची ओढ लागलेल्या मुलांनी गाडीकडे धूम ठोकली.

Web Title: aurangabad news marathwada children

टॅग्स