स्पर्धा परीक्षेसाठी लाखोंचा खर्च

प्रकाश बनकर
गुरुवार, 15 मार्च 2018

औरंगाबाद - प्रशासकीय नोकरी मिळवून सन्मानाचे जीवन जगण्यासाठी अनेक तरुण प्रयत्न करीत आहेत. यासाठी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थी तयारी करतात. गेल्या दहा वर्षांत स्पर्धा परीक्षा, बॅंकिंगची तयारी करण्याची संख्या झपाट्याने वाढली आहे. यात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा टक्‍का जास्त आहे. यासाठी विद्यार्थ्यांना लाखो रुपये खर्च करावे लागत आहे. यामुळे या विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासिकांप्रमाणेच मोफत क्‍लासेस सुरू करण्याची गरज आहे. यासाठी सामाजिक संस्था, संघटनांनी, राजकीय पक्षांनी पुढे येत ही सुविधा देण्याची गरज आहे. 

ग्रामीण भागातील हजारो तरुण शिक्षणासाठी तसेच स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी शहरात येतात. दोन ते तीन वर्षे नियोजनबद्ध पद्धतीने अभ्यास केल्यानंतर स्पर्धा परीक्षेत यश मिळण्याची शक्‍यता वाढते. यात अनेक विद्यार्थी प्रशासकीय सेवेत रुजूही झाले आहेत. मात्र विद्यार्थी वाढल्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेणाऱ्या क्‍लासेसची संख्याही झपाट्याने वाढली. क्‍लासेसमध्ये एका विद्यार्थ्यांस ७० हजार ते १ लाख रुपये वार्षिक खर्च येतो. यासह अभ्यासिका वेगळी, इतर स्पेशल क्‍लासेस वेगळे, नोट्‌स, अभ्यासाचे साहित्य यातही मोठा खर्च विद्यार्थ्याला करावा लागतो. शहरात स्पर्धा परीक्षा, बॅंकिंगच्या क्‍लासेसची संख्या २० हून अधिक आहेत. या प्रत्येक क्‍लासेसमध्ये जवळपास ५०० ते एक हजार विद्यार्थी तयारी करतात. म्हणजेच एकट्या औरंगाबादेत १५ ते २० हजार हून अधिक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहेत. 

वर्षाकाठी एक लाख रुपये खर्च 
 स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणारे विद्यार्थी हे प्रामुख्याने ग्रामीण भागातील आहेत. शहरात रूम करून शिक्षण घेतात. एका विद्यार्थ्यांस वर्षाकाठी कमीत कमी ७७ हजार ६०० रुपये ते एक लाख रुपयापर्यंत खर्च येतो. हा खर्च मराठवाड्यातील आहे. पुणे तर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्याचे माहेरघर म्हटले जाते. तेथे हा हा खर्च दुप्पट ते तिप्पट होतो.

एका विद्यार्थ्याला लागणारा वार्षिक खर्च
कोचिंग क्‍लासेस    ३० ते ५० हजार रुपये
पुस्तक, वृत्तपत्र, साप्ताहिक     ८ ते १० हजार रुपये 
अभ्यासिका    ९ हजार ६०० रुपये 
घरभाडे     १८ हजार रुपये 
वाहतूक खर्च    १२ हजार रुपये 

खासगी अभ्यासिका    अर्धवेळ शुल्क     पूर्ण वेळ शुल्क
साधी अभ्यासिका    ३५० रुपये    ५५० रुपये
वातानुकूलित अभ्यासिका    ६०० रुपये    ८०० रुपये

Web Title: aurangabad news marathwada Competition Examination student