दलितांवरील अत्याचाराची व्यथा मांडली रांगोळीतून

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जानेवारी 2018

औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनाच्या वर्धापनदिनानिमित्त ‘एक विचार, एक मंच’ ही संकल्पना पुढे आली. यासाठी उभारलेल्या दिव्यभव्य स्टेजसमोर रांगोळीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य प्रतिमेसह महराष्ट्रातील दलितांवर सातत्याने होणाऱ्या अन्याय-अत्याचाराची व्यथा मांडण्याचा प्रयत्न शासकीय कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केला. 

‘एक विचार, एक मंच’साठी उभारलेल्या भव्य स्टेजसमोर शासकीय कला महाविद्यालयातील फाईन आर्टचे विद्यार्थी कैलास खानझोडे, प्रदीप इंगोले, कुणाल कांबळे, सुमित खिल्लारे यांनी ही भव्य रांगोळी साकारली आहे. रांगोळीतून त्यांनी ‘भारताचं काळीज भीमा’ या मथळ्याखाली खैरलांजी, सागरची रिंगटोन, रोहित वेमुला, जवखेडा हत्याकांड, खर्डा हत्याकांड, गोविंद पानसरे, नितीन आगे, पोचीराम कांबळे, उनाकांड आणि कोरेगाव भीमा अशा विविध घटनांचा वेध रांगोळीतून घेण्याचा प्रयत्न रांगोळी कलाकारांनी केला आहे.

Web Title: aurangabad news marathwada namantar din dr babasaheb ambedkar marathwada unviersity rangoli