नामविस्तारदिनी भरगच्च कार्यक्रम

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जानेवारी 2018

औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनाच्या निमित्ताने महाविद्यालयांसह विविध पक्ष संघटनांतर्फे भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अभिवादन, दुचाकी फेरी, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर असे अनेक कार्यक्रम यानिमित्ताने घेण्यात आले. 

औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनाच्या निमित्ताने महाविद्यालयांसह विविध पक्ष संघटनांतर्फे भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अभिवादन, दुचाकी फेरी, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर असे अनेक कार्यक्रम यानिमित्ताने घेण्यात आले. 

धनगर समाज महासंघ
अखिल भारतीय धनगर समाज महासंघातर्फे विद्यापीठ गेटसमोर नामांतरातील शहिदांना अभिवादन करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष मल्हारराव नाचन डोणगावकर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाला गजहंस गुरुजी, श्री. शेजवळ, श्री. चंदा, रावसाहेब सोनकांबळे, रविकुमार कुलकर्णी, बाबूराव नरवडे, अमोल मगरे, सोमनाथ जाधव, अशोक काकडे, बळिराम नाचन, सौरभ गजहंस, विष्णू लांडे, संजय साळवे, आकाश मिसाळ, सचिन काकडे यांची उपस्थिती होती. 

शिवसेना दलित आघाडी
शिवसेना दलित आघाडीतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास व शहीद स्तंभास पुष्पहार अर्पण करण्यात आला.  जिल्हा संघटक मारोती साळवे, उपजिल्हा संघटक महेंद्र रगडे, शहर संघटक वैजिनाथ म्हस्के, उपशहर संघटक भाऊसाहेब चव्हाण, अनिल हिवराळे, रवी सुलाने, चंदनलाल इंगळे, सुनील सोनवणे, नंदकिशोर रगडे, अनिल गायकवाड, सूरज जगताप, अरुण खरात, अनिल म्हस्के, भाऊसाहेब हिवराळे, मनीष सोनवणे, अजय भालेराव, राजेंद्र भोसले, सागर भालेराव, ईश्‍वर गायकवाड, आनंद म्हस्के, दादासाहेब दाभाडे, चेतन म्हस्के यांची उपस्थिती होती. 

समाजवादी पार्टी
समाजवादी पार्टीतर्फे अभिवादन करण्यात आले. या वेळी पार्टीचे मराठवाडा प्रभारी शब्बू लखपती, महानगराध्यक्ष परविंदरसिंग वाही, शेख अल्ताफ बिल्डर, मोहम्मद जमा ऊर्फ कल्लूभाई, उत्तम उणे, अब्दुल हाफीज खान, राकेश आव्हाड, शेख आर्शद पटेल, गणेश गौरय्ये, मयूर भुजंगे, शेख शाहेद लखपती यांची उपस्थिती होती. 

राहुल पाईकडे मित्रमंडळ
मित्रमंडळातर्फे अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी राहुल पाईकडे, अमोल भुजंगे, प्रफुल्ल गायकवाड, जयंत श्रीरामे, शुभम मगरे, सागर पाईकडे, कुणाल साळवे यांची उपस्थिती होती.

Web Title: aurangabad news marathwada namantar din dr babasaheb ambedkar marathwada unviersity