चार अंगणवाड्यांत फिटे अंधाराचे जाळे

चार अंगणवाड्यांत फिटे अंधाराचे जाळे

औरंगाबाद - व्हिलेज सोशल ट्रान्स्फॉर्मेशनअंतर्गत निवडण्यात आलेल्या गावांपैकी पैठण तालुक्‍यातील चार अंगणवाड्यांतील अंधार सौरऊर्जेमुळे दूर झाला आहे. तालुक्‍यातील जांभळी, चिंचोली, मेहेरबान नाईक तांडा आणि जांभळी वाडी या चार गावांतील अंगणवाड्यांना पुरेसा वीजपुरवठा मिळत नव्हता. विद्यार्थ्यांना अंधारलेल्या खोल्यांतच शिक्षण घ्यावे लागत होते.

यामुळे मुख्यमंत्री ग्राम परिवर्तकांनी या गावांच्या पायाभूत सुविधांचा अभ्यास केला आणि त्यांना अंगणवाड्यांना न मिळणारा वीजपुरवठा दिसून आला. त्यामुळे या ग्रामपरिवर्तकांनी गावांमधील या अंगणवाड्यांमध्ये सौरऊर्जा उपक्रम राबवून या अंगणवाड्या सौरऊर्जेने जोडल्या गेल्या. यामुळे अंगणवाड्यांना चोवीस तास वीज मिळणे शक्‍य झाले आहे. 

मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून एक हजार गावे विकसित करून आदर्श गावे करण्यासाठी व्हिलेज सोशल ट्रान्स्फॉर्मेशन फाउंडेशनची (व्हीएसटीएफ) स्थापना करण्यात आली आहे. अपारंपरिक ऊर्जास्रोतांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गावांचे विद्युतीकरण केले जात आहे. सौरऊर्जेतून निर्माण झालेल्या विजेचे फायदे राज्यातील सर्वाधिक मागास आणि वंचित भागांमध्ये राहणाऱ्या लोकांना मिळवून दिले जात आहेत. त्याच अनुषंगाने पैठण तालुक्‍यातील चार अंगणवाड्यांमध्ये सौरऊर्जा उपक्रम राबविला गेला. यामध्ये ३०० ते ४०० मेगावॅट क्षमतेसह एकूण १३ रूफटॉप सौर पॅनेल बसवण्यात आले. यामुळे अंगणवाड्यांतील सुमारे साडेतीनशे विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. या उपक्रमाची अंमलबजावणी, प्रशिक्षण, ऑपरेशन आणि देखभाल या गोष्टी व्हीएसटीएफ आणि संबंधित गावांच्या ग्रामपंचायतींनी केलेल्या निधीतून पार पाडल्या जातील. 

या उपक्रमाचे उद्दिष्ट गावकऱ्यांना सामाजिक विकासासाठी सौरऊर्जेवर आधारित यंत्रणांचा फायदा मिळवून देण्याचे आहे. सौरऊर्जेच्या निर्मितीसाठी चांगल्या साधन-सुविधा असताना व्हीएसटीएफ आता इतर उपक्रमांना वीजस्रोत देण्याच्या योजना आखत आहे. त्यामुळे गावकऱ्यांना आणखी फायदे मिळतील. हा विजेचा एक असा स्रोत आहे जो राज्यातील जास्तीत जास्त दुर्गम भागांना ऊर्जा पुरवेल. सौरऊर्जेचा वापर केल्यामुळे गावकऱ्यांना ग्रीड पुरवठ्यापासून सुटका मिळेल आणि अत्यंत दुर्गम भागांमधील वीजपुरवठ्यापासून वंचित असलेल्या गावांना वीज मिळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com