जिल्ह्यात पावणेतीन लाख बालकांना पोलिओची लस

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जानेवारी 2018

औरंगाबाद - जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यात रविवारी (ता. २८) राबविण्यात आलेल्या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत जिल्ह्यात सर्वांत कमी लसीकरण झाले. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य विभागामार्फत तीन लाख २१ हजार ३७२ बालकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवले होते. त्या प्रमाणात दोन लाख ८८ हजार ८७७ बालकांना पोलिओ लस देण्यात आली. यासाठी शासनाकडून १९ हजार ७६३ कुप्यांमध्ये पोलिओची लसमात्रा आरोग्य विभागाला उपलब्ध करून देण्यात आली होती. 

विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते फुलंब्री व जातेगाव येथे बाळांना लस पाजून मोहिमेस सुरवात झाली. जिल्हा परिषदेच्या आरोग्य सभापती मीना शेळके आणि औरंगाबाद पंचायत समितीच्या सभापती ताराबाई उकिर्डे यांच्या हस्ते कुंभेफळ येथे, तर आमदार संदीपान भुमरे आणि जिल्हा परिषद वित्त व बांधकाम सभापती विलास भुमरे यांच्या हस्ते एकतुनी येथे बालकांना लस पाजण्यात आली. लसीकरणासाठी जिल्ह्यात दोन हजार २०१ बूथ स्थापन करण्यात आले होते. पाच हजार ८२८ अधिकारी व कर्मचारी मोहिमेसाठी नियुक्‍त करण्यात आले होते. जिल्ह्यात उद्दिष्टापैकी ९१.३० टक्के बालकांना पोलिओची लस देण्यात आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी सांगितले.

असे झाले तालुकानिहाय 
लसीकरण

 औरंगाबाद     ८६.२९ 
 सिल्लोड    ९९.३०
 फुलंब्री     ९३.४२
 पैठण     ८८.३४
 वैजापूर     ९५.५८
 गंगापूर     ९२.७८
 सोयगाव     ९०.६१
 खुलताबाद     ९८.२२
 कन्नड     ९३.९४  

Web Title: aurangabad news marathwada news child pulse polio vaccination