"प्रिया'वर चित्रित "त्या' गाण्यावर आक्षेप!

Priya Prakash
Priya Prakash

औरंगाबाद - आपल्या अदाकारीने अनेकांना घायाळ करणारी व रातोरात स्टार झालेली नटी प्रिया प्रकाश वॅरियर हिच्यावर चित्रित "ओरू अदार लव' या मल्याळम चित्रपटातील गाण्यावर जनजागरण समिती, एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांकडून आक्षेप घेण्यात आला. धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार त्यांनी जिन्सी ठाण्यात करून संबंधित व्यक्तींवर गुन्हा नोंदविण्याची मागणी केली आहे.

"ओरू अदार लव' या मल्याळम चित्रपटातील गाण्यातील काही दृश्‍ये सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर चित्रपटासह अभिनेत्री प्रिया प्रसिद्धीच्या झोतात आली; परंतु दुसरीकडे नव्या वादाला तोंड फुटले आहे. जनजागरण समितीने चित्रपटातील गाण्याबाबत आक्षेप नोंदवून जिन्सी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. चित्रपटातील गीताबद्दल आक्षेप असून, मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या. या गीतावर कायमची बंदी घालावी; तसेच टीव्ही चॅनेलवर हे गीत दाखविण्यात येऊ नये, अशी मागणी करण्यात आली. सोबतच चित्रपटाचे दिग्दर्शक, उमर लुलू व नायिका प्रिया प्रकाश वॉरियर, निर्माता, गीतकार, संगीतकार आदींविरुद्ध तक्रार पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. जनजागरण समितीचे अध्यक्ष मोहसीन अहेमद, आबिदा बेगम, नुमान अहेमद यांच्यातर्फे ही तक्रार देण्यात आली. एमआयएमचे बायजीपुरा येथील वॉर्ड अध्यक्ष शोएब सय्यद यांनीही जिन्सी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. चित्रपटातील गाण्याबाबत आक्षेप नोंदवून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com