'रोहयो' : मराठवाड्यात मजुरांच्या संख्येत सहापटीने वाढ 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 मे 2017

1 लाख 21 हजार मजूर

मराठवाड्यातील 6 हजार 643 पैकी 1 हजार 288 ग्रामपंचायतीने कामे सुरू केली आहेत. यामध्ये 9 हजार 370 कामे सुरू झालेली आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यात मार्च अखेर केवळ 17 हजार असलेली रोहयो मजुर उपस्थितीत आता मे अखेर दोन महिन्यानंतर 1 लाख 21 हजार 748वर पोहचली आहे. दोन महिन्यात मजुरांच्या संख्येत सहा पटीने वाढ झाली आहे. मागील काही दिवसांपासून रोहयो, जलयुक्त शिवार तसेच चला गावाकडे जाऊ या योजनांच्या माध्यमातून शासकीय योजना लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम सुरु केले आहे. अधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालुन काम केल्याने मजुरांच्या उपस्थितीत वाढ झालेली दिसते. 

या वर्षी रोहयोच्या कामात विभागीय आयुक्तांनी वैयक्तिक लाभांच्या योजना शेतकऱ्यांना कशा मिळतील यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यांनी मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात दौरा करुन बैठका सुद्धा घेतल्या आहेत. त्यामुळे रोहयोमध्ये शोषखड्डे, शेततळे, शौचालये, गांडुळ कंपोस्ट खत सारख्या वैयक्तिक लाभांच्या योजनांना प्राधान्य मिळाले. 

मराठवाड्यातील 6 हजार 643 पैकी 1 हजार 288 ग्रामपंचायतीने कामे सुरू केली आहेत. यामध्ये 9 हजार 370 कामे सुरू झालेली आहे. यात बीड जिल्ह्यातील 303 गावात 3 हजार 643 कामे सुरू आहेत. लातूर जिल्ह्यातील 282 ग्रामपंचायतीमध्ये 2090, नांदेड मधील 169 ग्रामपंचातीत 1094, जालना जिल्ह्यातील 77 ग्रामपंचायतीत 552, परभणीतील 89 ग्रापंचायतीमध्ये 604, उस्मानाबादच्या 124 ग्रामपंचायतीत 832 तर औरंगाबाद जिल्ह्यातील 203 ग्रापंचायतींमध्ये 1 हजार 342 कामांची संख्या आहेत. 

मराठवाड्यातील जिल्हानिहाय रोहयो मजूर उपस्थिती 
जिल्हे ............................... मजूर उपस्थिती 
औरंगाबाद .......................... 11778 
हिंगोली ............................. 3715 
उस्मानाबाद ......................... 7856 
परभणी.............................. 9027 
जालना.............................. 12979 
नांदेड................................ 15138 
लातुर................................ 26895 
बीड.................................. 39760 
एकूण................................. 1,21,748

Web Title: aurangabad news marathwada nrega labors six times more