ढिसाळ नियोजनाचा विद्यार्थ्यांना फटका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने मोठा गाजावाजा करून तीनदिवसीय केंद्रीय युवक महोत्सव घेतला. नियोजनाचा अभाव आणि स्टेजमधील अंतर याचा फटका विद्यार्थ्यांना सहन करावा लागला. लोकनाट्य, एकांकिका यासह विविध स्पर्धा नियमित वेळेच्या तीन ते चार तास उशिराने सुरू करण्यात आल्या. 

पहिल्याच दिवसापासून मिनीबसची व्यवस्था करण्याच्या मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. यामुळे कलाकारांना पायपीट करीत रंगमंच सहा व सातकडे जावे लागले. यासह स्टेज एकवर परीक्षकांसाठी कूलरची व्यवस्था करण्यात आली आणि प्रेक्षकांसाठी साधे फॅनही लावण्यात आलेले नव्हते. यामुळे उन्हाचा त्रास व उकडा सहन करीत या स्पर्धा पाहाव्या लागल्या. 

सोमवारी अनेक ठिकाणी स्पर्धा वेळेवर न सुरू झाल्यामुळे आयोजन समितीमधील प्रा. मुस्तजीब खान यांना प्रत्येक रंगमंचावर जाऊन वेळ पाळण्याचे निर्देश द्यावे लागले. परीक्षक, विद्यापीठातील प्राध्यापक यांचीच परवड होणार नाही यांची विशेष काळजी घेत महोत्सवात सहभागी झालेल्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले.

Web Title: aurangabad news marathwada university youth festival student