वीस मध्यम प्रकल्पांना अजून पाणीसाठ्याची प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 जुलै 2017

औरंगाबाद : मराठवाड्यातील 75 मध्यम प्रकल्पांपैकी वीस मध्यम प्रकल्पांना अजूनही उपयुक्‍त पाणीसाठ्याची प्रतीक्षा आहे. दुसरीकडे लघू, मध्यम, मोठ्या प्रकल्पांसह 854 प्रकल्पांत केवळ 14 टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. जूनच्या सुरवातीलाच पावसाने आपल्या लहरीपणाच्या दिलेल्या परिचयामुळे किंचित सुधार होण्यापलीकडे पाणीसाठा सरकू शकला नाही.

मराठवाड्यातील ज्या 20 मध्यम प्रकल्पांमध्ये अजूनही उपयुक्‍त पाणीसाठ्याची प्रतीक्षा आहे यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील 16 पैकी 13, बीड जिल्ह्यातील 16 पैकी 4, उस्मानाबाद जिल्ह्यातील 17 पैकी 2, तर नांदेड जिल्ह्यातील 9 मध्यम प्रकल्पांपैकी 1 मध्यम प्रकल्पाचा समावेश आहे. मराठवाड्यातील 11 मोठ्या प्रकल्पांमध्ये जूनअखेरपर्यंत केवळ 14.60 टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यापाठोपाठ 75 मध्यम प्रकल्पांतही 19.35 टक्‍के, 734 लघू प्रकल्पांमध्ये 12.94 टक्‍के, गोदावरी नदीवरील 11 बंधाऱ्यांमध्ये 11.73 टक्‍के, तर तेरणा, मांजरा, रेणा आदी नद्यांवरील 23 बंधाऱ्यांमध्ये केवळ 34.56 टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. मोठ्या प्रकल्पांपैकी परभणी जिल्ह्यातील येलदरी व हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्‍वर प्रकल्पात प्रत्येकी केवळ 3 टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. मराठवाड्याच्या सीमेवरील उर्ध्व पेनगंगा प्रकल्पा प्रकल्पात 4 टक्‍के तर उस्मानाबाद जिल्ह्यातील सिनाकोळेगाव प्रकल्पात 7 टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या वतीने देण्यात आली.

614 लघू प्रकल्पांत 25 टक्‍क्‍यांपेक्षा कमी पाणी
मराठवाड्यातील 734 लघू प्रकल्पांपैकी तब्बल 614 लघू प्रकल्पांमध्ये जूनअखेरपर्यंत 25 टक्‍क्‍यांपेक्षा कमी उपयुक्‍त पाणीसाठा उरला आहे. 80 लघू प्रकल्पात 25 ते 50 टक्‍के तर 26 लघू प्रकल्पात 50 ते 75 टक्‍के तर 14 लघू प्रकल्पात 75 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या वतीने देण्यात आली.

Web Title: aurangabad news marathwada watar and rain