मयूरपार्क परिसरातील कुंटणखान्यावर छापा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 जुलै 2017

औरंगाबाद - जळगाव रस्त्यावरील मयूरपार्क परिसरात कुंटणखान्यावर गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी (ता. दोन) रात्री साडेआठला छापा टाकला. एका अपार्टमेंटमध्ये चालणाऱ्या कुंटणखान्यावर केलेल्या या कारवाईत एका आंटीसह दोन तरुणींना अटक करण्यात आली.

मयूरपार्क परिसरातील हरसिद्धी अपार्टमेंटमध्ये वेश्‍या व्यवसाय सुरू असल्याची माहिती खबऱ्याने गुन्हे शाखेच्या पथकाला दिली होती. त्यानुसार पोलिसांनी त्यांचा एक डमी माणूस पाठवून खात्री केली आणि सापळा रचला. त्यानंतर घातलेल्या छाप्यात भाग्यश्री दादाभाऊ काळे (वय ३५) या आंटीला अटक करण्यात आली. 

तसेच कृष्णा काळे (वय ३८) या एजंटलाही ताब्यात घेण्यात आले आहे. वेश्‍या व्यवयाय करणाऱ्या दोन तरुणींनाही ताब्यात घेण्यात आले. यातील एक तरुणी २७ वर्षांची, तर एक २१ वर्षांची आहे. त्या जळगाव आणि वाळूज परिसरातील असल्याची माहिती कळाली आहे. पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विजय जाधव व हवालदार शेख हबीब यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: aurangabad news mayurpark crime

टॅग्स