अल्पवयीन मुलीला नातेवाइकांचाच डंख

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

औरंगाबाद - पोरकी झालेल्या पंधरावर्षीय मुलीने आत्याकडे आश्रय घेतला. पण तेथे तिच्यावर चुलत मामा व अन्य एका अल्पवयीन नातेवाइकाची वक्रदृष्टी पडली. दोघांनी तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचा प्रकार उघड झाला. या प्रकरणात संशयित मामा पसार असून, अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले.

औरंगाबाद - पोरकी झालेल्या पंधरावर्षीय मुलीने आत्याकडे आश्रय घेतला. पण तेथे तिच्यावर चुलत मामा व अन्य एका अल्पवयीन नातेवाइकाची वक्रदृष्टी पडली. दोघांनी तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचा प्रकार उघड झाला. या प्रकरणात संशयित मामा पसार असून, अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले.

सुनयना (नाव काल्पनिक) हिच्या वडिलांचे सात वर्षांपूर्वी व आईचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले. तिला दोन बहिणी व एक लहान भाऊ असून, ते सर्व बुलडाणा जिल्ह्यात आजीकडे राहतात. सुनयना जाधववाडीत आत्याकडे राहते. हलाखीच्या स्थितीत आत्या मातीकाम, तर सुनयना एका रुग्णालयात नर्स म्हणून काम करीत होती. जाधववाडीत सुनयनाच्या आईची आत्या व तिचा पंधरावर्षीय मुलगा अनिकेत (नाव काल्पनिक आहे) राहतो. त्याने सुनयनाशी संपर्क वाढविला. त्यानंतर ऑक्‍टोबर २०१७ ला त्याने तिला घरी नेले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. ही बाब सहन न झाल्याने ती रडत घरी आली. परंतु, बदनामीपोटी तिने आत्याकडे ही बाब सांगितली नाही. सुनयनाचा जयभवानीनगर येथे राहणारा चुलतमामा अमरीश (नाव बदलले आहे) हा सुनयनाला भेटण्यासाठी येत होता. त्यानेही तिला घरी बोलावले, सुनयना जेव्हा घरी गेली, त्यावेळी तिची मामी माहेरी गेली होती. ही बाब तिला समजताच तिने घरातून काढता पाय घेतला; पण गुंगी आणणारे औषध पाण्यात पाजून अमरीशने तिच्यावर अत्याचार केला व तिला ठार मारण्याची धमकी दिली. काही महिन्यांनी सुनयनाला गर्भधारणा झाली. यानंतर सुनयनासह आत्याने हर्सूल पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार संशयित दोघांविरुद्ध मंगळवारी (ता. २२) बलात्काराच्या गुन्ह्याची नोंद झाली.

डीएनए चाचणी करणार
या प्रकरणात सुनयनाच्या आईच्या आत्याचा मुलगा व चुलतमामा यांची डीएनए चाचणी करण्यात येणार आहे. यात संशयित अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, चुलतमामाचा शोध सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी सांगितले.

Web Title: aurangabad news Minor girl raped by relatives