वीज कंपन्यांतील कंत्राटी कामगारांनाही मिळणार बोनस 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

औरंगाबाद - वीज कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या ठेकेदारांच्या कामगारांनाही दिवाळी बोनस देण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने गठित केलेल्या समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समितीचे सदस्य सय्यद जहिरोद्दीन यांनी दिली. 

महावितरण, महापारेषण व महापनिर्मिती या तीनही कंपन्यांमध्ये ठेकेदारांच्या कंत्राटी कामगारांना समान काम समान वेतन मिळावे यासाठी सर्वोच्च न्यायालयच्या निर्देशानुसार कंत्राटी कामगारांसाठी समिती गठित केलेली आहे. या समितीची नुकतीच एक बैठक मुंबईमध्ये झाली. या बैठकीत कंत्राटी कामगारांच्या प्रश्‍नावर चर्चा करण्यात आली. यामध्ये कंपनीच्या कंत्राटी कामगारांना समान काम समान वेतन निर्णय होईपर्यंत वेतन देणे, त्याचप्रमाणे ठेकेदारांच्या कामगारांना बारा महिने काम केल्यावर तेराव्या महिन्याचा पगार बोनस म्हणून ठेकेदाराकडून घ्यावा व त्या ठेकेदाराने कंपनीला बिल सादर करून परिपूर्ती करून घ्यावी. ती रक्कम 3500 ते 9000 हजारपर्यंत राहणार आहे. समितीच्या या निर्णयामुळे वीज कंपनीतील ठेकेदारांच्या कामगारांना दिवाळीचा बोनस मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या बैठकीला समितीचे अध्यक्ष तथा कार्यकारी संचालक सचिन ढोले, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके, सदस्य सय्यद जहिरोद्दीन, मोहन शर्मा, अण्णा देसाई, आर. टी. देवकांत, नचिकेत मोरे यांची उपस्थिती होती. 

Web Title: aurangabad news mseb employee diwali bonus