विद्युतपुरवठा खंडित झाल्याने उद्योजकांचे कोट्यवधींचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

औरंगाबाद - रेल्वेस्टेशन एमआयडीसी भागाचा विद्युत पुरवठा खंडित झाल्याने तब्बल ५० कारखान्यांचे उत्पादन शनिवारी आणि रविवारी बंद राहिल्याने कंपन्यांना कोट्यवधींचा तोटा सहन करावा लागला आहे. रविवारी (ता. सहा) रात्री उशिरापर्यंत हा पुरवठा सुरळीत झाला नसल्याने अनेक उद्योगांनी सुटी जाहीर केली आहे. 

यादरम्यान झालेल्या नुकसानीचा आकडा अद्याप निश्‍चित झाला नसला तरी तो कोट्यवधींच्या घरात जाण्याची शक्‍यता आहे. याकडे विद्युत पुरवठा विभाग (एमएसईडीसीएल) आणि एमआयडीसी कार्यालयाने दुर्लक्ष केले आहे. सीएमआयएचे माजी अध्यक्ष आशिष गर्दे यांनी सांगितले, की शनिवारी दुपारी दोनपासून विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. रविवारीही तो पूर्ववत झालेला नव्हता. एमआयडीसी भागात काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली असल्याने खांबांवरील तारा तुटल्या असल्याचे कारण सांगितले जात आहे. औरंगाबाद रेल्वेस्टेशन एमआयडीसी परिसरात वारंवार अशा घटना घडू नयेत यासाठी काळजी घेण्याची मागणी करूनही महावितरण प्रशासन याकडे काणाडोळा करीत आहे.

Web Title: aurangabad news mseb MIDC