एसटीच्या ‘त्या’ पाच अधिकाऱ्यांवर दोषारोपपत्र

प्रकाश बनकर 
मंगळवार, 27 मार्च 2018

औरंगाबाद - नोटाबंदीनंतर सिडको बसस्थानकावरून लाखो रुपयांच्या नोटांची अदलाबदल झाली होती. यात रोखपालासह सहायक अधीक्षक अशा पाच अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याची माहिती समोर आली होती. या पाच जणांवर शुक्रवारी आणि शनिवारी (ता. २३ व २४) दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. या पत्राचे उत्तर आल्यानंतर या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात येणार असल्याचे एस. टी. महामंडळातर्फे सांगण्यात आले. 

उदगीर बसस्थानकातून आठ लाख रुपयांच्या नोटा बदल झाल्याचे प्रकरण उघड झाल्यानंतर सिडकोमध्येही नोटाबंदीच्या दुसऱ्या दिवशी लाखो रुपयांच्या नोटा बदल करण्यात आल्या. सिडकोतील चालक-वाहकांच्या तक्रारीमुळे हे प्रकरण समोर आले होते. या प्रकरणाची विभाग नियंत्रकांतर्फे चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर डिसेंबर २०१७ मध्ये परिवहनमंत्री यांनी माहिती मागवली होती. सिडको बसस्थानकातून आठ व नऊ नोव्हेंबरला तीन लाख आठ हजार ६३७ रुपयांच्या नोटा बदल करण्यात आल्या. याचा ‘सकाळ’ने पाठपुरावा केला. याविषयी १८ फेब्रुवारीला दोषारोपपत्र दाखल करण्याचे आदेश मुख्य कार्यालयातर्फे देण्यात आले होते. याविषयी सर्व प्रक्रिया पार पाडत ता. २३ व २४ मार्चला एस.टी. महामंडळाच्या मुंबईच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांतर्फे सिडकोचे तत्कालीन आगार व्यवस्थापक, सहायक वाहतूक अधीक्षक यांना दोषारोपपत्र देण्यात आले. तर औरंगाबाद विभागातील विभागीय वाहतूक अधीक्षक (अपराध) यांच्यातर्फे सिडको बसस्थानकातील लिपिक, टंकलेखक आणि रोखपाल यांना दोषारोपपत्र देण्यात आले. आता लेखी म्हणणे आल्यानंतर त्यांच्यावर पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’ला दिली. 

Web Title: aurangabad news MSRTC ST bus