मुक्‍तीसंग्रामात 'पाणंदमुक्तीची' जाहिरात भोवली

राजेभाऊ मोगल
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

प्रकरण अंगलट येण्याची शक्‍यता 
देशाच्या स्वतंत्र चळवळीच्या इतिहासातील एक सोनेरी पान असलेल्या या लढ्याचा वापर पाणंदमुक्ती योजनेच्या जाहिरात बाजीकरिता करण्यात आल्याने जनतेतून संताप व्यक्‍त होत आहे. हे प्रकरण प्रशासनाच्या अंगलट येण्याची शक्‍यता व्यक्‍त केली जात असून, मुक्‍तीसंग्रामाच्या कार्यक्रमात काही स्वातंत्र्यसैनिक मुख्यमंत्र्याची भेट घेऊन हा प्रकार मांडणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, मराठवाडा मुक्‍ती संग्रामाचा लढा मोठा असून, त्याची तुलना या योजनेशी केली जाऊ शकत नाही. संबंधित पोस्टरबाबत मला कुठलीही कल्पना दिलेली नव्हती किंवा परवानगीही घेतली नव्हती. या जाहिरातीच्या पोस्टरवर माझे नाव वापरल्याने तसेच विभागाचा प्रमुख म्हणून चुक मान्य करीत डॉ. भापकर यांनी दिलगिरी व्यक्त केली. 

औरंगाबाद : पाणंदमुक्तीमध्ये मराठवाड्याची होत असलेली पीछाडी दूर करण्यासाठी नागरिकांनी शौचालय बांधावे, यासाठी अधिकाऱ्यांनी चक्‍क मराठवाडा मुक्‍तसंग्राम दिनाचे औचित्य साधत चक्‍क "मराठवाडा हागणदारी मुक्ती संग्राम' अशा पद्धतीने बॅनरबाजी केली. या विरोधात पडसाद उमटताच संबंधित अधिकाऱ्यांनी माफीनामा दिला; तर त्यात विभागीय आयुक्‍तांचे नाव वापरण्यात आल्याने डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनीही दिलगिरी व्यक्ती केली. 

मराठवाड्याला निजामाच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी अनेकांनी बलिदान दिले. याचा इतिहासातील सुवर्ण पान असा उल्लेख केला जात असताना लातूर व उस्मानाबाद येथील सीईओंनी वाईट पद्धत अवंलबत आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केला. दोन दिवसांपूर्वी हे बॅनर लागताच त्याविरुद्ध सोशल मीडियावर टिकेचा भडीमार सुरू झाला. हा प्रकार समोर येताच आयुक्‍त भापकर यांनी दोन्ही सीईओंना याबद्दल सुनावले. त्यानंतर दोघांनी लेखी माफिनामा लिहून पाठवला आहे. विशेष म्हणजे या बॅनरवर डॉ. भापकर यांचेही नाव वापरल्यामुळे त्यांनीदेखील दिलगिरी व्यक्‍त केली. याबद्दल भापकर म्हणाले, ""लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात नागरिकांनी स्वच्छतागृह बांधावे, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पाणंदमुक्तीसाठी मुक्तीसंग्राम लढ्याचा आधार घेतल्याने या बॅनरबाजीमुळे स्वातंत्र्यसैनिकही संतापले आहेत. हे बॅनर तत्काळ काढण्यात आले आहे. 

प्रकरण अंगलट येण्याची शक्‍यता 
देशाच्या स्वतंत्र चळवळीच्या इतिहासातील एक सोनेरी पान असलेल्या या लढ्याचा वापर पाणंदमुक्ती योजनेच्या जाहिरात बाजीकरिता करण्यात आल्याने जनतेतून संताप व्यक्‍त होत आहे. हे प्रकरण प्रशासनाच्या अंगलट येण्याची शक्‍यता व्यक्‍त केली जात असून, मुक्‍तीसंग्रामाच्या कार्यक्रमात काही स्वातंत्र्यसैनिक मुख्यमंत्र्याची भेट घेऊन हा प्रकार मांडणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, मराठवाडा मुक्‍ती संग्रामाचा लढा मोठा असून, त्याची तुलना या योजनेशी केली जाऊ शकत नाही. संबंधित पोस्टरबाबत मला कुठलीही कल्पना दिलेली नव्हती किंवा परवानगीही घेतली नव्हती. या जाहिरातीच्या पोस्टरवर माझे नाव वापरल्याने तसेच विभागाचा प्रमुख म्हणून चुक मान्य करीत डॉ. भापकर यांनी दिलगिरी व्यक्त केली. 

Web Title: Aurangabad news mukti sangram