महापालिकेचा आकृतिबंध  महिनाभरात शासनाकडे 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 मे 2018

औरंगाबाद - महापालिकेतील कर्मचाऱ्यांचा आकृतिबंध आगामी महिनाभरात शासनाला पाठविण्यात येईल, तसेच रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू करू, असे आश्‍वासन आयुक्‍त डॉ. निपुण विनायक बुधवारी (ता. २३) सर्वसाधारण सभेत दिले. 

औरंगाबाद - महापालिकेतील कर्मचाऱ्यांचा आकृतिबंध आगामी महिनाभरात शासनाला पाठविण्यात येईल, तसेच रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू करू, असे आश्‍वासन आयुक्‍त डॉ. निपुण विनायक बुधवारी (ता. २३) सर्वसाधारण सभेत दिले. 

महापालिकेचा आकृतिबंध अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. शासनाने आगामी काळातील कर्मचारी-अधिकाऱ्यांची गरज व सेवा भरतीचे नियम तयार करून मंजुरीसाठी पाठविण्याचे महापालिकेला आदेश दिले होते; मात्र सर्वसाधारण सभेची मंजुरी न घेताच आकृतिबंध प्रशासनाने शासनाला सादर केला. त्यामुळे तो  परत पाठविण्यात आला. त्यानंतर सर्वसाधारण सभेत ऐनवेळी त्याला मंजुरी देण्यात आली. त्यावर नगरसेवकांनी आक्षेप घेतला म्हणून तो पुन्हा चर्चेसाठी ठेवण्यात आला. दरम्यान, तत्कालीन महापौर भगवान घडामोडे यांनी आकृतिबंध व सेवा शर्ती नियमांना मंजुरी दिली आहे; मात्र प्रशासनाचा अद्याप घोळ सुरू आहे. बुधवारी या संदर्भात चर्चा होताच आयुक्तांनी महिनाभरात आकृतिबंध अंतिम करून तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येईल, असे स्पष्ट केले. सध्या महापालिकेत ६५९ पदे रिक्त आहेत. ही पदे भरल्यास महापालिकेला आऊटसोर्सिंगची गरज भासणार नाही, असे आयुक्तांनी सांगितले. त्यामुळे महापालिकेत ६५९ पदांची भरती लवकरच होण्याची शक्‍यता आहे.

Web Title: aurangabad news Municipal corporation employees