पत्नीचा गळा आवळून खून करणाऱ्या पतीला जन्मठेप

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑगस्ट 2017

औरंगाबाद - माजलगाव (जि. बीड) येथील वजिराबाई सय्यद रहीम हिच्या खुनाच्या आरोपात पती सय्यद रहीम यास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे व न्यायमूर्ती सुनील कोतवाल यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सासरे वेगळे राहत असल्याने त्यांची खंडपीठाने निर्दोष मुक्तता केली. 

पती सय्यद रहीम याचे वजिराबाईसोबत १९९८ मध्ये विवाह झाला होता. पती सय्यद रहीम, सासरे सय्यद जानिमियॉं व सासू बानीबी वजिराबाईचा शारीरिक व मानसिक छळ करायचे. वजिराबाईचे सासू-सासरे घटनेच्या पंधरा दिवसापूर्वी शिंदे टाकळी येथे गेले होते. तेथे वजिराबाईचे चुलते उमर खान व वडील गुलाब खान यांच्याशी त्यांचे कडाक्‍याचे भांडण झाले होते. त्यानंतर ११ एप्रिल २००४ ला वजिराबाई घरात मृतावस्थेत आढळून आली होती. या प्रकरणी सुरवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. शवविच्छेदनानंतर गळा घोटून खून केल्याचे निष्पन्न झाले. वजिराबाईचे काका उमरखान यांच्या फिर्यादीवरून माजलगाव पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. सत्र न्यायालयाने पती, सासरा व सासूला खटल्यातून निर्दोष मुक्तता केलेली आहे. शासनाने या निर्णयास खंडपीठात आव्हान दिले. सुनावणीदरम्यान सासूचे निधन झाले. न्यायालयाने पती सय्यद रहीम याला जन्मठेप, तर सासऱ्याची निर्दोष मुक्तता केली. शासनातर्फे ऍड. सचिन सलगरे यांनी बाजू मांडली.

Web Title: aurangabad news murder crime