जालन्यात भरणार पहिले श्रमिक साहित्य संमेलन 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 ऑगस्ट 2017

औरंगाबाद - कामगार, शेतकरी, शेतमजूर यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा, या प्रमुख उद्देशाने महाराष्ट्र सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (सिटू) प्रणीत दोनदिवसीय पहिले श्रमिक साहित्य संमेलन 10 व 11 सप्टेंबरला जालना येथे आयोजित करण्यात आले आहे. 

संमेलनाचे उद्‌घाटन माजी कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनाध्यक्ष म्हणून ख्यातनाम विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांची निवड करण्यात आली आहे. 

संमेलनाच्या समारोपाला ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ, विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. रविवारी (ता. दहा) सकाळी साडेआठला ग्रंथसन्मान मिरवणुकीचे उद्‌घाटन माजी आमदार नरसय्या आडम यांच्या हस्ते होईल. दहाला डॉ. कोत्तापल्ले यांच्या हस्ते संमेलनाचे उद्‌घाटन होईल. या वेळी संमेलनाध्यक्ष डॉ. साळुंखे, वसंत आबाजी डहाके, दीनानाथ मनोहर, महावीर जोंधळे उपस्थित राहतील. दुपारी तीन ते पाचदरम्यान "कला आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य : सद्यःस्थिती' यावर परिसंवाद होईल. अध्यक्षस्थानी प्रा. जयदेव डोळे राहतील. यात गणेश विसपुते, आसाराम लोमटे, प्रतिमा जोशी, श्रीरंजन आवटे, राजकुमार तांगडे, धम्मसंगिनी यांचा सहभाग राहील. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम व कविसंमेलन होईल. 

दुसऱ्या दिवशी सोमवारी (ता. 11) सकाळी साडेनऊ ते साडेअकरा या दरम्यान "श्रमिकांचे मुक्तीलढे आणि मराठी साहित्य' यावर परिसंवाद होईल. अध्यक्षस्थानी कादंबरीकार कुमार अनिल, तर रवींद्र चावरेकर, शिल्पा कांबळे, प्रभू राजगडकर, श्रीधर पवार, डॉ. सुरेश वाघमारे, डॉ. अक्रम पठाण हे सहभागी होतील. दुपारी "ग्रामीण कष्टकरी आणि कला साहित्य' या विषयावर परिसंवाद होईल. अध्यक्षस्थानी कवी व समीक्षक डॉ. मनोहर जाधव राहतील. यात कथाकार सदानंद देशमुख, डॉ. जी. के. ऐनापुरे, डॉ. माधव गादेकर, राजाभाऊ भैलुमे, कवी व कादंबरीकार आनंद विंगकर हे सहभागी होणार आहेत. दुपारी अडीचला संमेलनाच्या समारोपात "श्रमिक संस्कृतीपुढील आव्हाने' या विषयावर विचारमंथन होईल. अध्यक्षस्थानी "सिटू'चे राज्याध्यक्ष डॉ. डी. एल. कराड राहतील. पी. साईनाथ, विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, उत्तम कांबळे, कुमार शिराळकर हे चर्चेत सहभागी होतील. ज्येष्ठ साहित्यिक किशोर घोरपडे व शम्स जालनवी यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. या संमेलनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. डी. एल. कराड, एम. एच. शेख, साईनाथ पवार, अण्णा सावंत यांनी केले आहे. 

Web Title: aurangabad news Nagnath Kottapalle shramik sahitya sammelan