ना. धो. महानोरांच्या वाढदिवसानिमित्त शेतात बरसल्या काव्यधारा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 सप्टेंबर 2017

कवी बंडू अंधेरे याने "फुलात न्हाली पहाट ओली, क्षितिजावरती रंग झुले, दवांत भिजल्या केशरीयाचे रंग फुलांवर ओघळले' ही महानोरांची कविता गाऊन सादर केली. या कवितेने सभोवतालच्या वातावरणात रंग भरला. यानंतर सुरेखा काळे यांनी "दिस आले दिस गेले', तर ध. सु. जाधव यांनी "मोडलेल्या माणसांचे दुःख ओले झेलताना' ही कविता सादर केली. मुंबईहून आलेल्या यामिनी दळवी हिने "ती साठाव्या वर्षीही तशीच तजेलदार' ही गंभीर कविता सादर केली.

जरंडी : या नभाने ह्या भुईला दान द्यावे.., आणि ह्या मातीतूनी चैतन्य गावे..,कोणती पुण्ये अशी येती फळाला.., जोंधळ्याला चांदणे लखडून जावे.., निसर्गकवी ना. धों. महानोर यांच्या या ओळी प्रत्येकाच्या ओठावर असतात. त्यांच्या अनेक कवितांनी काव्यरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. रानकवी महानोर यांच्या पळसखेड येथील शेतात त्यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी (ता. 16) काव्यधारा ग्रुपच्या युवा कविंनी महानोरांच्या कविता त्यांच्यासमोर सादर केल्या. आपली प्रत्येक कविता युवा कविंनी सादर केल्यानंतर त्या कवितेविषयीच्या आठवणी महानोरांनी रसिकांना सांगितल्या. 

कवी बंडू अंधेरे याने "फुलात न्हाली पहाट ओली, क्षितिजावरती रंग झुले, दवांत भिजल्या केशरीयाचे रंग फुलांवर ओघळले' ही महानोरांची कविता गाऊन सादर केली. या कवितेने सभोवतालच्या वातावरणात रंग भरला. यानंतर सुरेखा काळे यांनी "दिस आले दिस गेले', तर ध. सु. जाधव यांनी "मोडलेल्या माणसांचे दुःख ओले झेलताना' ही कविता सादर केली. मुंबईहून आलेल्या यामिनी दळवी हिने "ती साठाव्या वर्षीही तशीच तजेलदार' ही गंभीर कविता सादर केली. ओंकार काशिद याने " हे जीवन सुंदर' ही कविता सादर करून वाहवा मिळविली. सुहासिनी देशमुख हिने "नुकत्याच न्हालेल्या केसांना बांधू कसेबसे, जुन्यापुराण्या गोष्टींचे पापण्यांना ठसे, ही रचना सादर केली.

तुषार शिल्लक याने "थरथरती दिवाभीत पणती' शशिकांत कोळी याने "झाकड पडली थांबू नकोस' ही रचना तर कृष्णा काळदाते याने "पक्ष्यांचे लक्ष थवे' शरद सांळुखे याने "हंगाम दाटला पिकात पिवळी छाया, हे मावळतीच्या देवा तुझीच माया' ही कविता सादर केली. अविनाश भारती याने आईवरील "तुझ्या जुन्या लुगड्याच्या गोधडीचा परिमळ' ही रचना सादर करून वातावरण भारावून टाकले. ही मैफील रंगात आली असताना अनेकांनी यात उत्स्फुर्त सहभाग घेत महानोरांच्या कविता सादर केल्या. निलेश चव्हाण याने निवेदनातून ही सुंदर मैफील गुंफली आणि "या नभाने या भुईला दान द्यावे' या कवितेने सांगता केली. रविराज काळे याने आभार मानले. यावेळी ना. धों. महानोर यांच्या पत्नी सुलोचना महानोर, त्यांचा परिवार, तसेच विशाल बडे, विवेक देशमुख यांच्यासह काव्यरसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Aurangabad news ND Mahanor birthday

टॅग्स